![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोकप्रिय अभिनेत्याच्या 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; राहत्या घरातच संपवलं आयुष्य
Vijay Antony Daughter : लोकप्रिय अभिनेत्याच्या 16 वर्षीय मुलीने आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे.
![लोकप्रिय अभिनेत्याच्या 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; राहत्या घरातच संपवलं आयुष्य Composer Actor Vijay Antony 16 Year Old Daughter Meera Dies By Suicide Know Details Bollywood Entertainment लोकप्रिय अभिनेत्याच्या 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; राहत्या घरातच संपवलं आयुष्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/ce2d340737acb9f9ace484dbfbda52f21695097114859254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vijay Antony Daughter Meera Suicide : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि संगीतकार विजय अँटोनीच्या (Vijay Antony) 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. राहत्या घरातच तिने आयुष्य संपवलं आहे. विजय अँटोलीची लाडकी लेक मीराने (Vijay Antony Daughter Meera Suicide) मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास चेन्नईतील अलवरपेट येथील राहत्या घरी गळफास घेतला आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार,मीरा अँटोनी चेन्नईमधील अलवरपेट येथे राहत्या घरी पहाटे 3 वाजता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मीरा तणावाखाली असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मीरा ही बारावीत होती. चेन्नईतील एका लोकप्रिय महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. विजय अँटोनी हे दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील मोठं नाव आहे. विजय हा अभिनेता असण्यासोबत संगीतकार आणि निर्माताही आहे. विजयच्या पत्नीचे नाव फातिमा असून तिचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस आहे. विजय आणि फातिमा यांना मीरा आणि लारा या दोन मुली आहेत. आता मीराने आत्महत्या केली आहे.
Stay strong @vijayantony.. May God give you the power to bear this loss😭 https://t.co/WidvyNigrb
— Nivetha Sri (@nivethasriopm) September 19, 2023
#VijayAntony stay strong brother @vijayantony .
— aravIND (@DudeAravind) September 19, 2023
இது நடந்திருக்கக் கூடாது ☹️
வாழ்க்கை விலைமதிப்பற்றது, அதை வீணாக்காதீர்கள்.
मीरा अँटोलीच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. मीरा अँटोलीच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मीराने आत्महत्या केली यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. लहान वयात अभिनेत्री अशा कोणत्या तणावात होती, मीराने आयुष्याचा शेवट का केला असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. अभिनेते विजय यांच्या काही जवळच्या लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेची माहिती देत दु:ख व्यक्त केलं आहे.
विजय अँटोनी कोण आहे?
विजय अँटोनी हा लोकप्रिय अभिनेता आणि संगीतकार आहे. विजयने आजवर अनेक लोकप्रिय दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं आहे. विजयने अनेकवर्ष संगीतकार म्हणून काम केलं आहे. पण आता तो अभिनेता आणि संगीतकार असण्यासोबत निर्माता आणि दिग्दर्शनही आहे. विजयच्या पत्नीचे नाव फातिमा विजय अँटोनी आहे. तिची स्वत:ची निर्मिती संस्था आहे. विजयचा 'रथम' हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामुळे सध्या तो चर्चेत आहे.
संबंधित बातम्या
Ganesh Chaturthi 2023 : शिल्पा शेट्टी, राम चरण ते स्वप्नील जोशी; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचं आगमन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)