Raju Srivastav: ...आता राहिल्या फक्त आठवणी; विनोदवीर राजू श्रीवास्तव अनंतात विलीन
आज (22 सप्टेंबर) राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगम बोध येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
![Raju Srivastav: ...आता राहिल्या फक्त आठवणी; विनोदवीर राजू श्रीवास्तव अनंतात विलीन comedian raju srivastav cremated in delhi family members bid tearful farewell Raju Srivastav: ...आता राहिल्या फक्त आठवणी; विनोदवीर राजू श्रीवास्तव अनंतात विलीन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/22/2f0fb021ab99a754b360f672ce8df6721663832102124259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Raju Srivastav : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांचे काल (21 सप्टेंबर) निधन झाले. आज (22 सप्टेंबर) त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगम बोध येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राजू यांना त्यांच्या भावाने मुखाग्नी दिला. राजू श्रीवास्तव हे त्यांच्या विनोदीशैलीमुळे कायम प्रेक्षकांच्या आठवणीत राहतील.
राजू श्रीवास्तव यांचे पार्थिव त्यांच्या भावाच्या घरी म्हणजेच दशरथपुरी येथे ठेवण्यात आले होते. राजू यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक कलाकार आणि राजू यांचे चाहते दशरथपुरी येथे आले होते. तसेच कॉमेडियन सुनील पाल आणि एहसान कुरेशी यांनी देखील राजू श्रीवास्तव यांचे अंत्यदर्शन घेतले.
Delhi | Mortal remains of comedian #RajuSrivastav being taken to Nigambodh Ghat crematorium for last rites.
— ANI (@ANI) September 22, 2022
He passed away at AIIMS yesterday after being admitted here on August 10 after experiencing chest pain & collapsing while working out at the gym. pic.twitter.com/xosdquZoAY
अनेक कलाकार, राजकिय नेते आणि राजू यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली. राजू श्रीवास्तव यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कलाक्षेत्रातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सलमान खानच्या मैने प्यार किया या चित्रपटातील त्यांच्या विनोदी अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. राजू श्रीवास्तव यांनी अनेक चित्रपट आणि कार्यक्रमांमध्ये काम केलं. 'बिग बॉस 3', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळाली. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. ‘द किंग ऑफ कॉमेडी’ असंही राजू श्रीवास्तव यांना म्हणलं जातं. तसेच त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)