एक्स्प्लोर
Advertisement
‘दशक्रिया’ दाखवणार नाही, पुण्यातील ‘सिटी प्राईड’चा निर्णय
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यातील अनेक थिएटर आणि मल्टिप्लेक्सना भेटी दिल्या आणि उद्या प्रदर्शित होणारा ‘दशक्रिया’ सिनेमा दाखवू नये, अशी सर्व थिएटर, मल्टिप्लेक्सच्या प्रशासनाला विनंती केली.
पुणे : सिटी प्राईड कोथरुड मल्टिप्लेक्सने ‘दशक्रिया’ सिनेमा न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. बुक माय शो आणि इतर ऑनलाईन बुकिंग सिटी प्राईड कोथरुडकडून बंद करण्यात आलं आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यातील अनेक थिएटर आणि मल्टिप्लेक्सना भेटी दिल्या आणि उद्या प्रदर्शित होणारा ‘दशक्रिया’ सिनेमा दाखवू नये, अशी सर्व थिएटर, मल्टिप्लेक्सच्या प्रशासनाला विनंती केली होती.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या विनंतीला पुण्यातून सिटी प्राईड कोथरुडच्या रुपाने पहिला प्रतिसाद मिळाला आहे.
‘दशक्रिया’ला ब्राह्मण महासंघाचा विरोध
पुण्यातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दशक्रिया सिनेमाला विरोध दर्शवला आहे. सिनेमात ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याचा महासंघाचा आरोप आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून 64 वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. शुक्रवारी 17 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे
सिनेमा प्रदर्शित झाल्यास त्याविरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा ब्राह्मण महासंघाकडून देण्यात आला आहे.
संबंधित बातमी : ‘दशक्रिया’ चित्रपटाला अखिल भारतीय ब्राम्हण संघाचा विरोध
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
भविष्य
निवडणूक
Advertisement