![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
City Of Dreams 3 : साम दाम दंड भेद... 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज! जाणून घ्या कधी होणार रिलीज?
City Of Dreams : 'सिटी ऑफ ड्रीम्स' या बहुचर्चित वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![City Of Dreams 3 : साम दाम दंड भेद... 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज! जाणून घ्या कधी होणार रिलीज? City Of Dreams Season three know detials City Of Dreams Season 3 Release Date atul kulkarni Sachin Pilgaonkar Priya Bapat Web Series City Of Dreams 3 : साम दाम दंड भेद... 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज! जाणून घ्या कधी होणार रिलीज?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/21f89b8b07632e3fde0524249067af461684837277232254_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
City Of Dreams Season 3 : 'सिटी ऑफ ड्रीम्स 3' (City Of Dreams) या सीरिजचे दोन्ही सीझन सुपरहिट ठरले आहेत. आता या बहुचर्चित सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने सीरिजबद्दलची त्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सत्तेसाठीचा संघर्ष प्रेक्षकांना या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. स्वप्नांच्या नगरीवर राज्य करण्यात कोण कशापद्धतीने यशस्वी होतं हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
'सिटी ऑफ ड्रीम्स 3'मध्ये काय पाहायला मिळणार?
पहिल्या दोन सीझनमध्ये गायकवाड हे पात्र केंद्रस्थानी होतं. सत्तेसाठी प्रियजनांची हत्या किंवा मुलीने वडिलांच्या इच्छेविरुद्ध राजकारणात केलेला प्रवेश असो, या सर्व गोष्टी प्रेक्षकांनी पहिल्या दोन सीझनमध्ये पाहिल्या आहेत. पण आता तिसऱ्या सीझनमध्ये जगदीश गुरव आपली इच्छा व्यक्त करताना दिसणार आहेत.
View this post on Instagram
"राजकारणात प्रत्येकाला स्वत:चा विचार करावाच लागतो. पक्ष व साहेब दोघांचीही मी खूप सेवा केली. पण साहेब त्यांच्या मुलीकडेच सत्ता देणार. इमानदारी फक्त कुत्र्यांनीच करावी. राजकारणात कोणीही कोणाचे पाय दाबण्यासाठी नाही तर सत्तेसाठी येतात. मग यासाठी तुम्हाला कोणाचे पाय दाबावे लागू दे अथवा गळा", असा डायलॉग बोलतानाचा गुरव काकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सत्ता म्हणजे घराणेशाही नाही, असं त्याचं मत आहे.
साम दाम दंड भेदाचा अवलंब करत सत्ता बळकावण्याचा प्रयत्न होताना 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या तिसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत वेगवेगळे लढणारे गायकवाड यंदा मात्र एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे गायकवाड आणि इतरांमधील सत्तेसाठीचा संघर्ष या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.
'सिटी ऑफ ड्रीम्स 3' कधी होणार रिलीज? (City Of Dreams Season 3 Release Date)
'सिटी ऑफ ड्रीम्स 3' या सीरिजमध्ये अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni), सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि प्रिया बापट (Priya Bapat) मुख्य भूमिकेत आहेत. 26 मे 2023 रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये सध्याची राजकीय परिस्थिती दाखवण्यात आली आहे. प्रेक्षकांना आता या राजकीय नाट्य असणाऱ्या सीरिजची प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या
City of Dreams 3 : "सत्तेसाठी पाय दाबावे लागू दे अथवा गळा"; 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या तिसऱ्या सीझनचा प्रोमो आऊट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)