Chup On OTT : सनी देओल अन् दुलकर सलमानचा 'चुप' ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या कुठे होणार रिलीज?
Chup : दुलकर सलमान आणि सनी देओलचा 'चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट' हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Chup On OTT : बॉलिवूड अभिनेता दुलकर सलमान (Dulkar Salman) आणि सनी देओलच्या (Sunny Deol) 'चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट' (Chup: Revenge of the Artist) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.
'चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट' 25 नोव्हेंबरपासून ओटीटीवर!
थरार नाट्य असणाऱ्या 'चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट' या सिनेमात सनी देओल अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. सनी देओल, दुलकर सलमान व्यतिरिक्त या सिनेमात पूजा भट्ट, आणि श्रेया धनवंतरीदेखील मुख्य भूमिकेत आहेत. आता हा सिनेमा येत्या 25 नोव्हेंबरपासून प्रेक्षक झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
'चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट' हा सिनेमा 190 देशांतील प्रेक्षक हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत पाहू शकतात. आर बल्कीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने प्रेक्षक आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत.
View this post on Instagram
'चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट' या सिनेमाचे रिलीजआधीच 63,000 तिकीट विकले गेले होते. या बहुचर्चित सिनेमाचा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनदेखील भाग आहेत. पण या सिनेमात ते अभिनेता म्हणून दिसत नसून संगीत संयोजकाच्या भूमिकेत आहेत. दुलकरचे अनेक शेड्स या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत.
रहस्य उलगडणारा 'चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट'!
बनावट, खोट्या जगावर भाष्ट करणारा 'चुप' हा सिनेमा आहे. या सिनेमात अनेक क्लायमॅक्स आहेत. उत्तम सिनेमॅट्रोग्राफीमुळे सिनेमात प्रेक्षकांना अधिक गुंतवून ठेवतो. आर बल्की, राजा सेन आणि ऋषी विरमानी यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे. अनेक गोष्टींचं रहस्य उलगडणारा 'चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट' हा सिनेमा आहे.
संबंधित बातम्या