Crew Choli Ke Peeche song : 'पुन्हा एका गाण्याची वाट लावली', 'चोली के पिछे क्या हैं' गाण्यामधील करिनाच्या अंदाजावर प्रेक्षकांची नापसंती, माधुरीसोबत तुलना करत म्हणाले...
Crew Choli Ke Peeche song : क्रू या चित्रपटात माधुरीच्या एका गाण्यावर करिनाचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण यावर प्रेक्षक नाराज झाल्याचंही पाहायला मिळतंय.
Crew Choli Ke Peeche song : करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan), तब्बू (Tabbu) आणि क्रिती सॅनॉन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत असलेला 'क्रू' (Crew) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या सिनेमात 90च्या दशकांतील माधुरीच्या (Madhuri Dixit) एका गाजलेल्या गाण्याचा रिमेक पाहायला मिळणार आहे. माधुरीचं 'चोली के पिछे क्या हैं' ( Choli Ke Peeche song) या गाण्यावर करिनाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. दरम्यान या गाण्यावर प्रेक्षकांनी मात्र नापसंती दर्शवल्याचं पाहायला मिळतंय.
खलनायक या चित्रपटातील चोली के पिछे क्या हैं या गाण्याने एक वेगळाच ट्रेंड सेट केला होता. जो आजही कायम आहे. यामध्ये माधुरीच्या डान्सने आणि तिच्या एक्सप्रेशन्सनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण आता अनेक वर्षांनी करिना कपूर खान, तब्बू, आणि कृती सॅनॉन यांच्या क्रू या चित्रपटात या गाण्याचा रिमेक करण्यात आलाय. हे गाणं रिलीज होताच यावर प्रेक्षकांच्या देखील प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
प्रेक्षकांनी करिनाची केली माधुरीसोबत तुलना
हे गाणं प्रदर्शित होताच या गाण्यामधील करिनाची प्रेक्षकांनी माधुरीसोबत तुलना केली. हे रिमेक गाणं चित्रपटात अजिबात गरजेचं नव्हतं असं देखील अनेकांनी म्हटलं आहे. तसेच एकाने तर पुन्हा एका गाण्याची वाट लावली अशी देखील प्रतिक्रिया समोर आलीये. तसेच या गाण्यातील करिनाच्या एक्सप्रेशन्सवरही अनेकांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. यावर प्रेक्षकांनी म्हटलं की, करिना यापेक्षाही चांगलं करु शकली असती. त्याचप्रमाणे माधुरीच्या एक्सप्रेशन्ससोबत तिची तुलना करत तिच्या एक्सप्रेशन्स फार लाऊड असल्याचं म्हटलं आहे.
View this post on Instagram
'क्रू' कधी रिलीज होणार? (Crew Release Date)
'क्रू' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजेश कृष्णन यांनी सांभाळली आहे. भारतातील अनेक ठिकाणी या सिनेमाचं शूटिंग पार पडत आहे. या सिनेमाचं बऱ्यापैकी शूटिंग मुंबईत पार पडलं आहे. बालाजी टेलीफिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म अॅन्ड कम्युनिकेशन नेटवर्कच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. 29 मार्च 2024 रोजी हा सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल.