एक्स्प्लोर

Chitra Navathe: ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चित्रा नवाथे (Chitra Navathe) यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

Chitra Navathe: आपल्या अभिनयानं मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे (Chitra Navathe) यांचे बुधवारी (11 जानेवारी) सकाळी निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ मुलुंड (Mulund) येथील सरला नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ (Santacruz) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चित्रा नवाथे (Chitra Navathe Passed Away) यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

चित्रा नवाथे यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केले. त्यांनी 1952 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाखाची गोष्ट’ (Lakhachi Gosht) या चित्रपटात पहिल्यांदाच प्रमुख भूमिका साकारली. राजा परांजपे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. राजा गोसावी, चित्रा यांची बहीण रेखा कामत (Rekha Kamat),  शरद तळवलकर (Sharad Talwalkar) या कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. चित्रा आणि रेखा कामत या दोन बहिणींनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती.

वयाच्या 78 व्या वर्षी चित्रा नवाथे यांनी 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या टिंग्या (Tingya) चित्रपटात भूमिका साकारली. वहिनीच्या बांगड्या, गुळाचा गणपती (Gulacha Ganapati), बोलविता धनी, उमज पडेल तर, राम राम पाव्हणं, मोहित्यांची मंजुळा (Mohityanchi Manjula),अगडबम (Agadbam) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या बोक्या सातबंडे (Bokya Satbande) या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केलं.

अभिनेत्री चित्रा नवाथे यांनी चित्रपटाबरोबरच नाटकांमध्ये देखील काम केले. लग्नानंतर लग्नाची बेडी आणि तुझं आहे तुझपाशी (Tuz Ahe Tuz Pashi) या  नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. स्मिता तळवलकर दिग्दर्शित तू तिथे मी (Tu Tithe Mee) या 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून चित्रा नवाथे यांनी काम केले. चित्रा नवाथे  यांचा विवाह निर्माते, दिग्दर्शक दिवंगत राजा नवाथे यांच्याशी झाला होता. चित्रा नवाथे यांचे नाव कुसुम नवाथे (Kusum Navathe) असे होते पण ग. दि. माडगूळकर (Gajanan Digambar Madgulkar) यांनी त्यांचे नाव चित्रा असे नाव ठेवले होते. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 11 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Update : आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Kalyan Loksabha News : कल्याण मतदारसंघात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? कल्याणकरांचं मत कुणाला?Uddhav Thackeray On Police : कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोलVibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटकChanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Update : आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Telly Masala : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Embed widget