Brahmastra : आलिया-रणबीरच्या 'केसरिया' गाण्याने केला रेकॉर्ड, लवकरच सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Brahmastra : आलिया भट्ट, रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Brahmastra : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'केसरिया' (Kesariya) गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याने सर्वाधिक व्ह्यूजचा रेकॉर्ड केला आहे.
'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'केसरिया' गाण्याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. 'केसरिया' रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. सध्या हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अरिजीत सिंहने हे गाणं गायलं आहे. तर प्रीतमने संगीतबद्ध केलं आहे. तसेच या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्यने लिहिले आहेत. युट्यूब व्हिडीओ चार्टवर हे गाणं पहिल्या स्थानावर आहे. या गाण्याला 3.66 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.
View this post on Instagram
'केसरिया' हे रोमॅंटिक गाणं आहे. या गाण्यात प्रेक्षकांना रणबीर आणि आलियाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. बनारसमधील काशी विश्वनाथ मंदिराच्या परिसरात या गाण्याचे काही भाग शूट करण्यात आले आहेत. 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधी या गाण्याचा टीझर रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नादरम्यान रिलीज करण्यात आला होता. त्याला दोन कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.
9 सप्टेंबरला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. बॉलिवूड स्टार रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता नागार्जुन यांचाही या मल्टीस्टारर चित्रपटात समावेश आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रणबीर आणि आलियाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
संबंधित बातम्या
Kesariya Song Released: आलिया-रणबीरच्या प्रेमाची कहाणी, ‘ब्रह्मास्त्र’चं ‘केसरिया’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
Brahmastra Kesariya Song : 'केसरिया' गाण्याला ट्रोल करणाऱ्यांना रणबीर आणि अयान मुखर्जीचं उत्तर; म्हणाले....
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
