Box Office Collection: 'फुकरे 3' नं केली बंपर कमाई ; 'चंद्रमुखी 2' आणि 'द वॅक्सिन वॉर' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....
Box Office Collection: फुकरे 3 (Fukrey 3), द वॅक्सिन वॉर (The Vaccine War) आणि चंद्रमुखी 2 (Chandramukhi 2) हे तीन चित्रपट 28 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आले. जाणून घेऊयात या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...
![Box Office Collection: 'फुकरे 3' नं केली बंपर कमाई ; 'चंद्रमुखी 2' आणि 'द वॅक्सिन वॉर' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन.... box office collection day 2 know fukrey 3 the vaccine war and chandramukhi 2 box office collection Box Office Collection: 'फुकरे 3' नं केली बंपर कमाई ; 'चंद्रमुखी 2' आणि 'द वॅक्सिन वॉर' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/30/919e973efe26028790597c71ab8cb11b1696056123872259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Box Office Collection: गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. 28 सप्टेंबर रोजी तीन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. फुकरे 3 (Fukrey 3), द वॅक्सिन वॉर (The Vaccine War) आणि चंद्रमुखी 2 (Chandramukhi 2) हे तीन चित्रपट 28 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आले. या तीन चित्रपटांचे दुसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात...
'फुकरे 3' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Fukrey 3 Box Office Collection)
फुकरे 3 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं द वॅक्सिन वॉर आणि चंद्रमुखी 2 या दोन्ही चित्रपटांना मागे टाकले आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, फुकरे 3 या चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 8.82 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 7.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. फुकरे 3 या चित्रपटानं दोन दिवसात 16.32 कोटींची कमाई केली आहे. फुकरे 3 चित्रपटामध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी, मनजोत सिंग आणि रिचा चढ्ढा .यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
'द वॅक्सिन वॉर' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन (The Vaccine War Box Office Collection)
Sacnilk च्या रिपोर्टनुसार द वॅक्सिन वॉर या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 1.3 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 85 लाखांची कमाई केली आहे.
View this post on Instagram
'चंद्रमुखी 2' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Chandramukhi 2 Box Office Collection)
चंद्रमुखी 2 चित्रपटानं पहिल्या दिवशी 8.25 कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटाने हिंदीमध्ये 17 लाख रुपये, तमिळमध्ये 5.57 कोटी रुपये आणि तेलगूमध्ये 2.5 कोटी रुपये कमावले आहेत. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4.50 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर एकूण कलेक्शन 12.75 कोटी झाले आहे.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)