ड्रग्ज प्रकरण भोवणार? कुली नंबर 1चा 'सारा' खेळ खल्लास!
कुली नंबर वन हा चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात वरुण धवनची मुख्य भूमिका आहे. तर चित्रपटाची नायिका आहे सारा अली खान. हा सिनेमा ओटीटीवर 25 डिसेंबरला येणार आहे.
मुंबई : परिस्थिती कशी कुणाला वाकवेल याचा नेम नसतो. गेल्या चार पाच महिन्यात हिंदी इंडस्ट्रीत घडणाऱ्या घडामोडींनी हे पदोपदी दाखवून दिलं आहे. सध्या अभिनेत्री सारा अली खानही त्याच फेज मधून जात आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने जो तपास चालू केला त्यात सारा अली खानही होती. तिच्यावर झालेले आरोप आणि तिने एनसीबीला दिलेली उत्तरं ही लोकांना कळली. याचा परिणाम आता कुली नंबर 1 या सिनेमावर होणार आहे.
कुली नंबर वन हा चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात वरुण धवनची मुख्य भूमिका आहे. तर चित्रपटाची नायिका आहे सारा अली खान. हा सिनेमा ओटीटीवर 25 डिसेंबरला येणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनचे प्लॅन्स आता तयार होऊ लागले आहेत. अशात वरुण आणि सारा ही जोडी सिनेमात असली तरी सिनेमाचं प्रमोशन सारा करणार नाहीय असं कळतं. एनसीबीच्या चौकशीचा आणि तिने त्यांच्याकडे दिलेल्या उत्तराचा फटका तिला बसेल आणि परिणामी सिनेमालाही बसेल असं निर्मात्यांना वाटत आहे.
सारा अली खानची चौकशी एनसीबीने केली तेव्हा, अंमली पदार्थाबाबत बोलताना तिने सुशांत अमली पदार्थाचं सेवन करत असल्याचं सांगितलं. त्यावेळी या मुली वेळ आल्यावर गेलेल्या जीवावर कसे आरोप करतायत असाही सूर उमटला होता. साराचं सुशांतसोबत असलेलं अफेअर त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी घालवलेला एकत्रित वेळ. सुशांत आणि तिने केलेली ट्रीप अशा अनेक गोष्टी त्यात समोर आल्या होत्या. आता कुली नंबर १ च्या प्रमोशनसाठी साराला आणलं तर मिडिया तिला तेही प्रश्न विचारेल अशी भीती निर्मात्यांना वाटते. तर त्याची उलटी पब्लिसिटी होऊन सिनेमावर परिणाम होऊ नये असं निर्मात्यांना वाटतं. त्यामुळे तूर्त साराला सिनेमाच्या पब्लिसिटीपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात ते पाहाणं कुतुहलाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :