एक्स्प्लोर

मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाअक्षयविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय विरोधात बलात्कार, फसवणूक आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिथुन आणि योगिता बाली यांचा पुत्र महाक्षयविरोधात याप्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय (मिमोह चक्रवर्ती) विरोधात बलात्कार, फसवणूक आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिथुन आणि योगिता बाली यांचा पुत्र महाअक्षयविरोधात याप्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओशिवरा पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, 15 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात महाअक्षय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता ही मॉडल आहे. महाअक्षय आणि ती एकमेकांना अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. महाअक्षय आणि पीडिता 2015 पासून रिलेशनशिपमध्ये होते. महाअक्षयने या काळात पीडितेला लग्नाचं अमिष दाखवत शारीरिक संबंध स्थापित केले.

अधिकाऱ्यानं सांगितलं की, साल 2015 मध्ये महाअक्षयने पीडितेला घरी बोलावलं आणि तिच्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये नशेचं औषध घातलं आणि यावेळी महाअक्षयनं तिच्यासोबत जबरदस्ती केली. त्यानंतरही अनेकदा त्यानं पीडितेला लग्नाचं अमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला.

आधी दिल्लीच्या बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये योगिता बाली आणि महाक्षयवर बलात्काराचा गुन्हा दाखल होता. पीडितेने या प्रकरणात मुंबई पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्यासाठी धाव घेतली होती, पण मुंबईत एफआयआर होऊ शकली नाही. त्या दरम्यान पीडिता दिल्लीला शिफ्ट झाली. जिथे तिने दिल्लीतील रोहिणी कोर्टात एफआयआर दाखल करण्यासाठी अपील केली, कोर्टाने प्राथमिक पुराव्यांच्या आधारे या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.

तर आरोपीने दिल्ली हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आणि दाखला दिला की हे कोर्टाचे अधिकारक्षेत्रात नाही. प्रकरण काही दिवसात कोर्टात चाललं याच्यानंतर कोर्टाने आदेश दिले की ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे एफआयआर नोंदविण्यात यावी. याच्यानंतर गुरुवारी मुंबईच्या ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व प्रकरणावर मिथुन चक्रवर्ती किंवा त्यांच्या कुटुंबियांनीची बाजू अद्याप कळू शकलेली नाही.

या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी आरोपीचा जवाब नोंदवलेला नाही. पोलिसांचं म्हणणं आहे की, आम्ही लवकरच आरोपीला पोलिस स्टेशनला बोलवणार आहोत आणि त्याचा जवाब नोंदवणार आहोत. येणाऱ्या दिवसात चक्रवर्ती कुटुंबीयांच्या अडचणीत नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dhanush Spotted With Mystery Woman: धनुषसोबत मिस्ट्री वुमन स्पॉट, व्हिडीओ तुफान व्हायरल, साऊथ सुपरस्टारसोबत दिसलेली 'ती' कोण?
धनुषसोबत मिस्ट्री वुमन स्पॉट, व्हिडीओ तुफान व्हायरल, साऊथ सुपरस्टारसोबत दिसलेली 'ती' कोण?
Shraddha Kapoor First Reaction On Etha Movie: 'स्त्री 2 नंतर बऱ्याच ऑफर्स आल्या, भरमसाठ पैसेही दिले, पण...'; श्रद्धा कपूरनं बड्या ऑफर्स नाकारून 'ईठा'ला होकार का दिला?
'स्त्री 2 नंतर बऱ्याच ऑफर्स आल्या, भरमसाठ पैसेही दिले, पण...'; श्रद्धा कपूरनं बड्या ऑफर्स नाकारून 'ईठा'ला होकार का दिला?
Ruchita Jadhav in Baipan bhari Deva: 'एक रुपयाही नको...'; 'बाईपण भारी देवा'साठी रुचिता जाधवने मानधन घेतलं नाही, सांगितलं कारण
'एक रुपयाही नको...'; 'बाईपण भारी देवा'साठी रुचिता जाधवने मानधन घेतलं नाही, सांगितलं कारण
Sachin Pilgaonkar: 'तो माझा मुलगा, माझ्या हृदयाचा तुकडा'; सचिन पिळगावकरांचा मुलगा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक? स्वत:च केला मोठा खुलासा
'तो माझा मुलगा, माझ्या हृदयाचा तुकडा'; सचिन पिळगावकरांचा मुलगा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक? स्वत:च केला मोठा खुलासा

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
Hasan Mushrif : गोकुळ दूध संघावर 5 शासननियुक्त सदस्य; नवीद मुश्रीफांची निवड होणार?; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, काय म्हणाले?
गोकुळ दूध संघावर 5 शासननियुक्त सदस्य; नवीद मुश्रीफांची निवड होणार?; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, काय म्हणाले?
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
Sharad Pawar Health Update: शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
राजू शेट्टींच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, आंदोलनातील नेमक्या मागण्या काय अन् कोंडी फोडण्यासाठी कितीवर तडजोडची तयारी? आज चेअरमन, संचालकांच्या दारात 'शिमगा' आंदोलन
राजू शेट्टींच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, आंदोलनातील नेमक्या मागण्या काय अन् कोंडी फोडण्यासाठी कितीवर तडजोडची तयारी? आज चेअरमन, संचालकांच्या दारात 'शिमगा' आंदोलन
US Elections Results 2026: अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प विवेक रामास्वामींसाठी मैदानात, तरीही दारुण पराभव
अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प विवेक रामास्वामींसाठी मैदानात, तरीही दारुण पराभव
Embed widget