एक्स्प्लोर

Cinematography Bill 2021: केंद्र सरकार कोणत्याही चित्रपटावर बंदी आणणार? नव्या विधेयकावरुन वाद

Cinematography Bill 2021: नवीन सिनोमेटोग्राफी विधेयक 2021 वर आज संसदीय समिती चर्चा करणार आहे. केंद्र सरकार कोणत्याही चित्रपटावर बंदी आणू शकते अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. 

Cinematography Bill 2021: केंद्र सरकारच्या नवीन सिनोमेटोग्राफी विधेयक, 2021 वरुन आता वाद होण्याची शक्यता आहे. एखाद्या चित्रपटामुळे देशाच्या कायदा व सुव्यवस्थेला धोका आहे किंवा सामाजिक परिस्थिती बिघडू शकते असं वाटल्यास त्या चित्रपटावर बंदी आणण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. सरकारची ही तरतूद म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा आरोप चित्रपट सृष्टीतील काही विश्लेषकांनी केला आहे. 

सिनोमेटोग्राफी विधेयक, 2021 वर आज संसदीय समितीच्या माध्यमातून चर्चा होणार आहे. त्यामध्ये चित्रपट सृष्टीच्या वतीनं अभिनेते कमल हसन भाग घेणार आहेत. केंद्र सरकारच्या या नव्या विधेयकाला निर्माते सुधीर मिश्रा, अनुराग कश्यप आणि विशाल भारद्वाज यांच्या सोबत अनेकांनी विरोध दर्शवला आहे. 

सिनोमेटोग्राफी कायदा, 1952 अन्वये भारतात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन CBFC) ची निर्मिती करण्यात आली आहे. आता केंद्र सरकारने सिनोमेटोग्राफी कायदा, 1952 सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने याबद्दल 18 जून रोजी घोषणा केली होती. नियमानुसार, कोणत्याही विधेयकावर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी किमान 30 दिवसांचा कालावधी देण्याची गरज असताना केंद्र सरकारने यासाठी केवळ 14 दिवसांचा कालावधी दिला आहे. आता हा कालावधी 2 जुलै रोजी समाप्त झाला असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. 

काय तरतूदी आहेत या विधेयकात?
सिनोमेटोग्राफी विधेयक 2021 नुसार, सरकारला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन CBFC) ने दिलेल्या सर्टिफिकेटमध्ये बदल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच एखाद्या चित्रपटामुळे देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला किंवा सामाजिक परिस्थिती बिघडली असल्याचं केंद्र सरकारचं मत झाल्यास त्या चित्रपटावर बंदी आणण्याचा अधिकार केंद्र सरकारला देण्यात आला आहे. ही तरतूद म्हणजे देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा अनेकांनी आरोप केला आहे. 

पायरसीच्या बाबतीत एखादा व्यक्ती दोषी आढळला तर त्याला तीन महिन्यापासून तीन वर्षांपर्यत शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे. तसेच पायरेटेड चित्रपटाच्या प्रोडक्शन व्हॅल्यूच्या 5 टक्के रक्कम ही दंड म्हणून वसूल करण्याची तरतूदही देण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Embed widget