एक्स्प्लोर

अख्ख्या बॉलिवूडचा गाडा एकट्यानं हाकू शकतं फोटोतलं 'हे' गोंडस बाळ, मोठमोठ्या सेलिब्रिटींना बोटावर नाचवतो, आज आहे मोठा स्टार...

Bollywood Celebrities Childhood Photo: सध्या असाच एका बॉलिवूड सेलिब्रिटीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून नेमका कुणाचा आहे, असाच प्रश्न सर्वांना पडतोय.

Bollywood Celebrities Childhood Photo: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या (Bollywood Celebrity) भोवती नेहमीच चाहत्यांचा गराडा असतो. त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांचं प्रोफेशनल आयुष्य कसं आहे? सध्या त्यांच्या आयुष्यात काय घडतंय? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात असतात.  सोशल मीडियाच्या या जमान्यात बॉलिवूड सेलिब्रिटींशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टीही त्यांच्या चाहत्यांपर्यंत सहज पोहोचतात. काही वेळा सेलिब्रिटी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे स्वतः बद्दलचे अपडेट्स देतात, तर काही वेळा इतर सोर्सेकडून सेलिब्रिटींच्या अपडेट्स चाहत्यांना मिळत असतात. 

काही वेळा सेलिब्रिटी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे स्वत:बद्दलचे अपडेट्स देतात, तर काही वेळा इतर सोर्सेसकडून चाहत्यांपर्यंत माहिती पोहोचते. त्याचप्रमाणे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटोही अचानक सोशल मीडियावर येतात आणि त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांना ओळखणं कठीण होतं. सध्या असाच एका बॉलिवूड सेलिब्रिटीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून नेमका कुणाचा आहे, असाच प्रश्न सर्वांना पडतोय. या फोटोमधल्या सेलिब्रिटीला ओळखणं खरंच खूप मोठं आव्हान आहे.  

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये एक लहान मूल त्याच्या आईच्या मांडीवर पाहू शकता. हे मूल कॅमेऱ्याकडे बघून निरागसपणे हसत असल्याचं फोटोमध्ये दिसतंय. तुम्ही ओळखलं नसेलच... पण आम्ही तुम्हाला सांगतो की, हा मुलगा सध्या बॉलिवूडच्या यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. फोटोत निरागसपणे हसणाऱ्या या मुलानं आता जर ठरवलं, तर तो संपूर्ण बॉलिवूडचा गाडा एकट्यानंही हाकू शकतो. सध्याच्या टॉप दिग्दर्शकांमध्ये समाविष्ट होणाऱ्या या मुलानं आलिया भट्ट, शाहरुख खान, सलमान खान यांच्यापासून ते अगदी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं आहे. अजुनही तुम्ही या मुलाला ओळखलं नसेलच. हा मुलगा दुसरा, तिसरा कुणीच नसून बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर आहे. करण जोहरचा बालपणीचा फोटो असून त्यामध्ये तो खरंच खूपच गोंडस दिसत आहे. 

अख्ख्या बॉलिवूडचा गाडा एकट्यानं हाकू शकतं फोटोतलं 'हे' गोंडस बाळ, मोठमोठ्या सेलिब्रिटींना बोटावर नाचवतो, आज आहे मोठा स्टार...

करण जोहर (Karan Johar) बऱ्याच काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आजवर त्यानं अनेक महत्त्वाचे आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, ए दिल है मुश्किल, स्टूडेंट ऑफ द इयर यांसारखे चित्रपट करण जोहरनं बॉलिवूडला दिले आहेत. 

करणनं आदित्य चोप्राच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटात शाहरूख खानच्या मित्राची भूमिका करून आपल्या बॉलिवूडमधील कारकिर्दीची सुरुवात केली. 1998 साली त्याने कुछ कुछ होता है ह्या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. ह्या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर करणने शाहरूख खानसह अनेक चित्रपट काढले जे सर्व सुपरहिट झाले. करण जोहर, शाहरूख खान आणि काजोल यांचं त्रिकूट बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस त्रिकुट मानलं जातं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

"मला तुमच्या बायकोशी लग्न करायचंय..."; गायिकेवरच्या प्रेमासाठी प्रसिद्ध गायकानं ओलांडल्या मर्यादा, पतीकडेच मागितलेला 'तिचा' हात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramgiri Maharaj : सनातनी जागे झाले तर जगात उलथापालथ करतील, अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू; हिंदू मोर्चातून रामगिरी महाराजांचा हल्लाबोल
सनातनी जागे झाले तर जगात उलथापालथ करतील, अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू; हिंदू मोर्चातून रामगिरी महाराजांचा हल्लाबोल
Adani Meets Devendra Fadnavis: उद्योगपती गौतम अदानी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी बातमी: उद्योगपती गौतम अदानी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Toss The Coin IPO : आयपीओ खुला होताच GMP वर बोलबाला,109 टक्के परताव्याचा अंदाज, पैसे दुप्पट होणार?
कमाईची मोठी संधी, आयपीओ खुला होताच GMP 109 टक्क्यांवर, पैसे दुप्पट होणार?
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 10 December 2024Kurla Bus Accident : कुर्ल्यात बेस्ट बस अपघात प्रकरण;आरोपीचं कुटुंब ABP Majhaवर ExclusiveMarkadwadi :निवडणूक कशावरही घ्या;मोहिते पाटलांच्या उमेदवाराला 55 गावातून कमीच मतं मिळणारRajan Naik Local Train : लोकलचा प्रवास, भजनाचा आनंद , राजन नाईक यांचा लोकलने प्रवास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramgiri Maharaj : सनातनी जागे झाले तर जगात उलथापालथ करतील, अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू; हिंदू मोर्चातून रामगिरी महाराजांचा हल्लाबोल
सनातनी जागे झाले तर जगात उलथापालथ करतील, अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू; हिंदू मोर्चातून रामगिरी महाराजांचा हल्लाबोल
Adani Meets Devendra Fadnavis: उद्योगपती गौतम अदानी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी बातमी: उद्योगपती गौतम अदानी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Toss The Coin IPO : आयपीओ खुला होताच GMP वर बोलबाला,109 टक्के परताव्याचा अंदाज, पैसे दुप्पट होणार?
कमाईची मोठी संधी, आयपीओ खुला होताच GMP 109 टक्क्यांवर, पैसे दुप्पट होणार?
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत : चंद्रशेखर बावनकुळे
उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांची बोचरी टीका
Beed News : सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
Rohit Sharma : ॲडलेड कसोटीत पुरती लाज गेल्यानंतर सुनील गावसकर टीम इंडियाच्या मदतीला, रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला
ॲडलेड कसोटीत पुरती लाज गेल्यानंतर सुनील गावसकर टीम इंडियाच्या मदतीला, रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला
सगळं मोफत वाटण्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा, मोफत लाभाच्या योजनांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत
सगळं मोफत वाटण्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा, मोफत लाभाच्या योजनांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत
Embed widget