एक्स्प्लोर
सोनम कपूर लवकरच विवाहबंधनात अडकणार
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नानंतर ‘फॅशनिस्टा’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोनम कपूरही आता परदेशातच डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. ‘मुंबई मिरर’ने याबाबतचे वृत्त दिलं आहे.
मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नानंतर ‘फॅशनिस्टा’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोनम कपूरही आता परदेशातच डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. ‘मुंबई मिरर’ने याबाबतचे वृत्त दिलं आहे.
सोनम आणि तिचा प्रियकर आनंद अहुजा येत्या मे महिन्याच्या 11 आणि 12 तारखेला स्वित्झर्लंडमध्ये मोठ्या दिमाखदार सोहळ्यात विवाहबंधनात अडकणार असल्याचं मिररनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. तसेच, या विवाहसोहळ्यात पाहुण्यांना आमंत्रणाची सर्व जबाबदारी खुद्द अनिल कपूर यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
याशिवाय, संगीत, मेंदीचा कार्यक्रम आणि पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पार पाडणार असल्याचंही कळत आहे. तर सोनमच्या आवडीच्या म्हणजेच अबू जानी आणि संदीप खोसला या डिझायनरना पसंती देईल, असंही सांगितलं जात आहे.
सोनमच्या जोडीदारासाठी कपूर कुटुंबियांची जवळपास तीन महिन्यांच्या शोधमोहीम सुरु होती. अखेर ही शोध मोहीम स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा शहरात ही शोध मोहीम थांबली. ती मे महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याने, या लग्नसोहळ्याची धूम येत्या काळात अनेकांचे डोळे दिपवणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement