Kiara Advani : कियारा आडवाणीच्या संगीत सोहळ्यात भाऊ मिशालने गायलेलं 'हे' गाणं; व्हिडीओ व्हायरल
Kiara Sidharth Wedding : कियारा नुकतीच लग्नबंधनात अडकली असून सध्या तिच्या भावाने शेअर केलेला संगीताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Kiara Advani Sidharth Malhotra : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा Sidharth Malhotra) नुकतेच राजस्थानमधील सूर्यगढ महालात लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या शाही विवाहसोहळ्यासह प्री-वेडिंग फंक्शननेदेखील चाहत्यांचं चांगलच लक्ष वेधून घेतलं. नवविवाहित जोडप्याने अद्याप त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची झलक चाहत्यांना दाखवली नसली तरी कियाराचा भाऊ मिशाल आडवाणीने त्यांच्या संगीत सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिशाल आपल्या बहिणीच्या संगीत सोहळ्यात गाणं गाताना दिसत आहे.
बहिणीसाठी भावाने गायलं खास गाणं
कियाराच्या संगीत सोहळ्यात तिच्या भावाने म्हणजेच मिशालने गाणं गायलं असून या गाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बहिणीच्या संगीत सोहळ्यासाठी मिशालने काळ्या रंगाची शेरवानीने परिधान केली होती. तसेच त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये संगीत सोहळ्यतील खास सजावटीची झलकदेखील पाहायला मिळत आहे. कियाराच्या संगीतात मिशालने 'तेरी ऑंखों से याद आया मेरी बातों में प्यार' हे गाणं गायलं आहे.
View this post on Instagram
मिशालने व्हिडीओ शेअर करत कियारा आणि सिद्धार्थला टॅग केलं आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"तेरी ऑंखों से याद आया मेरी बातों में प्यार". या व्हिडीओवर कियारानेदेखील कमेंट केली आहे.
सिद्धार्थ -कियारा 7 फेब्रुवारीला अडकले लग्नबंधनात
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. या लग्नसोहळ्यात कुटुंबीय आणि जवळचे मित्र-मंडळी उपस्थित होते. करण जौहर, मीरा राजपूत, शाहीद कपूर, अमृतपाल सिंह बिंद्रा, तान्या घावरी आणि जूही चावलासह अनेक सेलिब्रिटींनी या लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती. लग्नानंतर दिल्लीत सिड-कियाराचं एक ग्रॅंड रिसेप्शन पार पडलं. आता बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी 12 फेब्रुवारीला मुंबईत रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.
सिद्धार्थ-कियाराच्या (Kiara Advani Sidharth Malhotra Wedding) लग्नाची चाहत्यांना उत्सुकता होती. आता ते लग्नबंधनात अडकले असल्याने चाहते आनंदी झाले आहेत. सिड-कियाराने सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांचे लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
संबंधित बातम्या