एक्स्प्लोर

Bollywood Actress : फोटोत ओरडणारी लहान मुलगी कोण? क्रिकेटरसोबत केलंय लग्न; ओळखलंत का?

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक मुलगी ओरडताना दिसत आहे. ही अभिनेत्री नक्की कोण हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न या अभिनेत्री करत होता. बॉलिवूड अभिनेत्रीचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एका अभिनेत्रीने आपल्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या फोटोमध्ये एक छोटी मुलगी दिसून येत आहे. फोटोतील लहान मुलीला ओळखणे कठीण जात आहे. फोटोत दिसणारी लहान मुलगी ही बॉलिवूडचे सुपरस्टारची लेक आणि क्रिकेटरची पत्नी आहे. त्यामुळे आता ही अभिनेत्री नक्की कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

फोटोतील लहान मुलगी कोण? 

फोटोत दिसणारी लहान मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) आहे. अथिया शेट्टीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपला बालपणीचा गोड फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने क्यूट फ्रॉक परिधान केलाला दिसत आहे. तसेच अभिनेत्री जोरजोरात ओरडतानाही दिसून येत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

अथिया शेट्टीने शेअर केला फोटो (Athiya Shetty Shared Photo)

अथिया शेट्टीने आपल्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"प्यारा लेकिन वृश्चिक". हा फोटो स्टोरीवर शेअर करत तिने 'मूड' असं लिहिलं आहे. फोटो शेअर करत अथियाने आपला राग दाखवला असल्याचं म्हटलं जात आहे. प्रेग्नंसीच्या अफवांदरम्यान अभिनेत्रीची ही प्रतिक्रिया असल्याचं म्हटलं जात आहे. अथियाच्या या पोस्टमुळे ती प्रेग्नंट नसल्याचं स्पष्ट होत आहे. 

अथिया-राहुलबद्दल जाणून घ्या... 

अथिया शेट्टी आणि केएल राहुल (KL Rahul) 23 जानेवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडकले. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील बंगल्याच त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. अथिया शेट्टीने 'हीरो' या चित्रपटाच्या माध्यमातून 2015 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्री 2017 मध्ये 'मुबारकां'मध्ये झळकली. अथिया शेवटची 2019 मध्ये आलेल्या 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटात दिसून आली आहे. या चित्रपटानंतर अथिया शेट्टी सिनेसृष्टीपासून दूर आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा अभिनेत्री प्रयत्न करते. 

सुनील शेट्टीच्या 'त्या' वक्तव्याने सुरू झाल्या प्रेग्नंसीच्या चर्चा

सुनील शेट्टी सध्या माधुरी दीक्षितसोबत (Madhuri Dixit) 'डान्स दीवाने' कार्यक्रमाचं परिक्षण करत आहेत. या कार्यक्रमात नुकताच ग्रँडपैरेंट्स स्पेशल एपिसोड पार पडला. त्यावेळी सुनील शेट्टी म्हणाले,"मी पुढच्या वेळी जेव्हा या सीझनचं परिक्षण करेल तेव्हा मी आजोबा झालेला असेल". सुनील शेट्टीच्या या वक्तव्यानंतर अथियाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना सुरुवात झाली. 

अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाला आता एक वर्ष झालं आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं नातं जगजाहीर केलं होतं. दोघे एकमेकांना वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या पाठिंबा देताना दिसून येतात.

संबंधित बातम्या

Athiya Shetty Pregnant : सुनील शेट्टी लवकरच आजोबा होणार? अथियाच्या प्रेग्नंसीबाबत स्वत:च दिली मोठी अपडेट, 'पुढच्या वेळेस...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'प्रसिका'ला लाखोंचा धक्का; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रसाद अन् दीपिका वेदपाठक यांचं Verified चॅनेल्स सस्पेंड; कारण काय?
'प्रसिका'ला लाखोंचा धक्का; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रसाद अन् दीपिका वेदपाठक यांचं Verified चॅनेल्स सस्पेंड; कारण काय?
रश्मिका अन् विजय देवरकोंडांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त; पत्रिका सोशल मीडियात व्हायरल, रिसेप्शनला कधी, तुम्ही जाताय?
रश्मिका अन् विजय देवरकोंडांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त; पत्रिका सोशल मीडियात व्हायरल, रिसेप्शनला कधी, तुम्ही जाताय?
राजपाल यादवनंतर अमिषा पटेलच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?
राजपाल यादवनंतर अमिषा पटेलच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?
'मी 6, 10 कोटी खर्च केले तरीही...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरनं सोडलं मौन, म्हणाली..
'मी 6, 10 कोटी खर्च केले तरीही...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरनं सोडलं मौन, म्हणाली..

व्हिडीओ

Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report
Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report
Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report
Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
Embed widget