'ठाकरे' सिनेमा टॅक्स फ्री करा, भाजप चित्रपट आघाडीची मागणी
'ठाकरे' सिनेमावरील मनोरंजन कर माफ करण्याची मागणी भाजप चित्रपट आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन विनोद तावडे यांनी दिलं आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमा टॅक्स फ्री करावा, अशी मागणी भाजपच्या चित्रपट आघाडीने केली आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना याबाबतचं पत्र भाजप चित्रपट आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं आहे.
'ठाकरे' सिनेमावरील मनोरंजन कर माफ करण्याची मागणी भाजप चित्रपट आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन विनोद तावडे यांनी दिलं.
'ठाकरे' सिनेमाची निर्मिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे संजय राऊत आणि शिवसेनेला गोंजारण्यासाठी चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याच्या हालचाली सरकारने सुरु केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि कार्निव्हल मोशन पिक्सर्च निर्मित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.
नवाझुद्दीन सिद्दीकी या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत असून मराठी भाषेसाठी अभिनेते सचिन खेडेकर यांनी आवाज दिला आहे. तर अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
ठाकरे सिनेमाचे म्युझिक लाँच 12 जानेवारीला मुंबईत एका शानदार सोहळ्यात केले जाणार आहे. या चित्रपटाला आघाडीचे संगीतकार रोहन-रोहन यांनी संगीत दिले आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांतील गाण्यांचं लाँचिंग एकत्रच होईल. हिंदी भाषेतील गाणे प्रसिद्ध पार्श्वगायक सुखविंदर सिंग यांनी तर मराठीतील गाणे हरहुन्नरी गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी गायलं आहे.
संबंधित बातम्या
सत्तर रुपयांचा 'शिववडा' खात थिएटरमध्ये 'ठाकरे' पाहा!
'ठाकरे' साठी दोन हिंदी चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलल्या!
'ठाकरे' सिनेमातील संवादावर अभिनेता सिद्धार्थचा आक्षेप
'ठाकरे' व्यतिरिक्त कोणताही सिनेमा रिलीज होऊ देणार नाही : बाळा लोकरे
बायोपिकच्या सिक्वलचाही विचार, 'ठाकरे' च्या ट्रेलर लॉन्चिंगला दिग्गजांची उपस्थिती