एक्स्प्लोर
नीतू कपूर आलिया आणि रणबीरसोबत बर्थ डे सेलिब्रेशन करणार
अभिनेता रणबीर कपूर याची आई नीतू कपूर यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. या खास दिवशी संपूर्ण कपूर कुटुंबीय पॅरिसमध्ये सेलिब्रेशन करत आहे. अभिनेत्री आलिया भट्टने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत नीतू कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मुंबई : अभिनेता रणबीर कपूर याची आई नीतू कपूर यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. या खास दिवशी संपूर्ण कपूर कुटुंबीय पॅरिसमध्ये सेलिब्रेशन करत आहे. अभिनेत्री आलिया भट्टने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत नीतू कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आलिया भट्ट ही नीतू यांच्या 'बर्थ डे सेलिब्रेशन'मध्ये सहभागी होण्यासाठी पॅरिसला जाणार असल्याची माहिती आहे. आलिया आणि रणबीर कपूर यांच्या रिलेशनशीपबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांनी काही दिवसांपूर्वी सर्वांसमोर आपण रिलेशनमध्ये असल्याचं मान्यही केलं होतं.आलियाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत नीतू कपूर यांना शुभेच्छा दिल्या.
नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी यांनी पॅरिसमधील 'बर्थ डे सेलिब्रेशन'चे काही फोटो शेअर केले आहेत.
आलियाबद्दल रणबीर कपूर काय म्हणाला? काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर हा आलियासोबत असलेल्या नात्याबद्दल उघडपणे बोलला होता. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने पुन्हा एकदा या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. “हे नातं अजून नवीन आहे. त्यामुळे त्यावर आत्तापासूनच बोलण्याची माझी इच्छा नाही.या नात्याला श्वास घेऊ द्या, थोडा वेळ द्या,” असं रणबीरने या मुलाखतीत म्हटलं आहे. दरम्यान, आलिया आणि रणबीरच्या प्रेमाला ‘ब्रम्हास्त्र’ या अयान मुखर्जींच्या सिनेमाच्या शुटिंगपासूनच सुरुवात झाली. याच सिनेमाची शुटिंग थोड्याच दिवसांत पुन्हा एकदा बुल्गारियामध्ये सुरु होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
क्राईम
Advertisement