Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेच्या सासूवर भडकली राखी सावंत; म्हणाली,"कैकेयी बनू नका, शांत राहा"
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' फेम अंकिता लोखंडेच्या (Ankita Lokhande)सासूवर राखी सावंत (Rakhi Sawant) भडकली आहे.
Bigg Boss 17 Rakhi Sawant Reaction on Ankita Lokhande Mother in Law : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. नुकताच या कार्यक्रमाचा 'फॅमिली वीक' पार पडला. या 'फॅमिली वीक'नंतर अंकिता लोखंडेच्या (Ankita Lokhande) आईवर राखी सावंत (Rakhi Sawant) भडकलेली दिसून आली.
'बिग बॉस 17' या कार्यक्रमाच्या नुकत्याच पार पडलेल्या भागात अंकिता लोखंडे आणि विकी जैनची आई आलेली पाहायला मिळाली. विकीच्या आईने अंकिताकडे आपली नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या,"तू विकीला लाथ मारल्यानंतर त्याच्या वडिलांनी लगेचच तुझ्या आईला फोन केला होता". विकीच्या आईच्या बोलण्याने अंकिताला खूप वाईट वाटलं होतं. आता बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंतने अंकिताला पाठिंबा देत विकीच्या आईला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.
राखी सावंतने विकीच्या आईला शांत राहण्याचा दिला सल्ला
राखी सावंत आणि 'बिग बॉस'चं एक वेगळच कनेक्शन आहे. 'बिग बॉस 17' राखी सावंत फॉलो करत आहे. राखीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओमध्ये राखी सावंत अंकिता लोखंडेला पाठिंबा देताना आणि विकीच्या आईला शांत राहण्याचा सल्ला देताना दिसत आहे.
View this post on Instagram
राखी सावंत काय म्हणाली?
राखी सावंत म्हणाली,"नमस्कार मित्रांनो, मला अंकिताच्या सासूबाईंना सांगायचं आहे की,सासूदेखील कधी सून होती. पती-पत्नीमध्ये तुम्ही कशाला कबाब में हड्डी होत आहात? तुमच्या मुलाने अंकितासोबत आता संसार थाटला आहे. तुम्ही शांत राहा. मजा करा".
राखी सावंत पुढे म्हणाली,"बिग बॉस 17'ची ट्रॉफी अंकिता लोखंडे जिंकणार आहे. मी आता ही भविष्यवाणी केली आहे. आमची मराठी मुलगी 'बिग बॉस' जिंकणार. त्यावेळी सून जिंकल्यानंतर तुम्हाला वेगळा आनंद होईल. सूनेचा आदर करा. तर तुमच्या मुलीचाही तिच्या सासरी आदर केला जाईल".
'बिग बॉस 17' हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. या कार्यक्रमाचा कोण विजेता होणार याकडे 'बिग बॉस'प्रेमींचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या