एक्स्प्लोर

Bhool Bhulaiyaa 3 Movie : 'भूलभुलैया 3' मध्ये विद्या बालनसह दिसणार धक् धक् गर्ल! रुहबाबासोबत झळकणार 'ही' स्टार किड

Bhool Bhulaiyaa 3 Movie : 'भूल भुलैया -3' हा चित्रपटात कार्तिक आर्यन आणि विद्या बालन देखील असणार आहेत. त्याहून मोठं सरप्राइज म्हणजे या चित्रपटात 'धक् धक् गर्ल' माधुरी दीक्षितदेखील असणार आहे,

Bhool Bhulaiyaa 3  Movie Vidya Balan :    हॉरर कॉमेडीपट असलेल्या 'भुलभूलैया ' चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.  'भुलभूलैया ' (Bhool Bhulaiyaa) चित्रपटाच्या सीरिजचा आता तिसरा भाग येणार आहे.  'भुलभूलैया -3' हा चित्रपटात कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि विद्या बालन (Viday Balan) देखील असणार आहेत. त्याहून मोठं सरप्राइज म्हणजे या चित्रपटात 'धक् धक् गर्ल'  माधुरी दीक्षितदेखील (Madhuri Dixit) असणार असल्याचे वृत्त आहे.  आधीच्या दोन्ही भागांप्रमाणे आता 'भुलभूलैया -3' देखील बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवणार का याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 

माधुरीची खास भूमिका

दिग्दर्शक अनीस बज्मी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, माधुरी दीक्षित, विद्या बालन आणि कार्तिक आर्यन यांच्या भूमिका असणार आहेत. या चित्रपटात माधुरी दीक्षित ही भूताची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. 'मिड-डे' या वृत्तसंस्थेला सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील कथानकाला एक खास वेगळं देण्यासाठी माधुरीची निवड करण्यात आली आहे. 

रुह बाब करणार भूतांचा सामना 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात रूह बाबा विरुद्ध माधुरी दीक्षित आणि विद्या बालन साकारत असलेल्या भूतांचा सामना होणार आहे. दोन्ही दिग्गज अभिनेत्रींना एकत्र आणत दिग्दर्शकाने आता हुकूमाचा एक्का काढला असल्याचे म्हटले जात आहे.  'भुलभूलैया -3' मध्ये रुह बाबा साकारणाऱ्या कार्तिक आर्यनसोबत सारा अली खान झळकणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

अक्षय कुमारही असणार?

दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी अक्षय कुमार या चित्रपटात काम करणार नसल्याचे म्हटले आहे. अक्षय कुमार 'भुलभूलैया 3' या चित्रपटात नसला तरी अनीस त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. 'भुलभूलैया 3' मध्ये राजपाल यादव आणि संजय मिश्रासोबत माधुरी आणि विद्या बालन यांच्याही भूमिका आहेत. 

कधी सुरू होणार चित्रीकरण?

'भुलभूलैया 3' हा येत्या तीन महिन्यात फ्लोरवर जाणार असल्याची माहिती आहे. हा चित्रपट दिवाळीच्या सुमारास अथवा वर्ष अखेरीस रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

इतर संबंधित बातमी :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक

व्हिडीओ

Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report
Zp Election Voting Politics : मतदानाचा 'पोर'खेळ, लोकशाहीचा खेळ? Special Report
Pawar Family Together : पार्थ पवार- शरद पवारांचे एकत्र फोटो पाहून राजकीय चर्चेला उधाण Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
Embed widget