Bholaa Box office collection: अजयच्या 'भोला' चा बॉक्स ऑफिसवर जलवा; तिसऱ्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई, जाणून घ्या कलेक्शनबाबत...
रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अजयच्या (Ajay Devgn) भोला (Bholaa) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत...
Bholaa Box office collection: अभिनेता अजय देवगणचे (Ajay Devgn) चाहते भोला (Bholaa) या चित्रपटाची उत्सुकेतेने वाट बघत होते. हा चित्रपट 30 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बूचा देखील अॅक्शन अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी भोला या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत...
भोला चित्रपटानं ओपनिंग डेला जबरदस्त कमाई केली पण दुसऱ्या दिवशी मात्र या चित्रपटात घट झाली. आता तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (1 एप्रिल) या चित्रपटानं 12.10 कोटींची कमाई केली आहे. आता रविवारी हा चित्रपट किती कमाई करेल? याकडे अजयच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
तीन दिवसात केली एवढी कमाई
तरण आदर्शच्या सोशल मीडियावरील पोस्टनुसार, भोला या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 11.20 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 7.40 कोटी कमाई केली आहे. आता तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शननंतर या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई 30.70 कोटी एवढी झाली आहे.
View this post on Instagram
जर तुम्ही अॅक्शन चित्रपट पाहण्याची आवड असेल तुम्ही अजय देवगणाचा भोला हा चित्रपट पाहू शकता. एका मीडिया रिपोर्टनुसार अजय देवगणचा हा चित्रपट जवळपास 125 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. अजयचा हा चित्रपट त्याच्या 'दृश्यम 2' चित्रपटाप्रमाणेच बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का? हे लवकरच समजेल.
अजयनं भोला या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. या चित्रपटासाठी त्याने 30 कोटी मानधन घेतलं आहे. तसेच बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabu) या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून या सिनेमासाठी तिने चार कोटी मानधन घेतलं आहे.
भोला चित्रपटात अजय देवगणसोबतच तब्बू, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, अमाला पॉल आणि गजराज राव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. भोला हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झालेल्या कॅथी या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेव्हा लोकेश कनगराजने केलं होतं. भारतात हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या:
Ajay Devgn : 'भोला'साठी अजय देवगणने किती घेतलं मानधन? आकडा वाचून थक्क व्हाल