एक्स्प्लोर
Dawood Properties: दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांवर पुन्हा सरकारचा हातोडा, Ratnagiri मधील जमिनींचा लिलाव जाहीर
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) संबंधित रत्नागिरीतील (Ratnagiri) मालमत्तांचा पुन्हा एकदा लिलाव होणार आहे. ही कारवाई SAFEMA कायद्याअंतर्गत करण्यात आली असून, ४ नोव्हेंबर रोजी लिलावाची प्रक्रिया पार पडेल. या लिलावात दाऊद इब्राहिमशी संबंधित रत्नागिरीतील शेतजमीन आणि इतर तीन मालमत्तांचा समावेश आहे, अशी माहिती समोर आली आहे. या मालमत्तांमध्ये खेड तालुक्यातील मुंबके गावातील १७१ चौरस मीटर शेतजमीन सर्वाधिक चर्चेत आहे, जी दाऊदची आई अमिना बी यांच्या नावावर होती. जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या लिलावात पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा या मालमत्ता लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. या लिलावातून सरकारला सुमारे वीस लाख रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion


















