Bharat Jodo Yatra: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा भारत जोडो यात्रेत सहभागी; फोटो शेअर करत म्हणाला, 'यात्रेत एक आठवडा घालवल्यानंतर...'
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं (Kunal Kamra) भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतला. त्यानं सोशल मीडियावर भारत जोडो यात्रेतील राहुल गांधी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला.
Rahul Gandhi: काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी यांच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) अनेक नेत्यांनी तसेच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 21 डिसेंबरला हरियाणात प्रवेश करण्यापूर्वी काँग्रेसची ही पदयात्रा राजस्थानमध्ये 17 दिवसांत सुमारे 500 किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून या यात्रेला सुरुवात झाली. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं (Kunal Kamra) भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतला. त्यानं सोशल मीडियावर भारत जोडो यात्रेतील राहुल गांधी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला.
कुणाल कामराची पोस्ट
राहुल गांधी यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन कुणालनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'भारत जोडो यात्रेत एक आठवडा घालवल्यानंतर मला वाटते की लोक यात्रेला न जाण्याचा निर्णय घेऊन तटस्थ राहण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेच्या विरोधात उभे राहणे देखील लोकशाही आहे. जी 2014 पूर्वी होती.'
View this post on Instagram
भारत जोडो यात्रेच्या ट्विटर अकाऊंटवरुन देखील कुणाल आणि राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेतील फोटो शेअर करण्यात आला. 'इस भीड़ भीड़ में भारत है मिलजुल के चलते जाएंगे एकता का परचम लहराएंगे' असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं.
इस भीड़ भीड़ में भारत है
— Bharat Jodo (@bharatjodo) December 14, 2022
मिलजुल के चलते जाएंगे
एकता का परचम लहराएंगे#BharatJodoYatra pic.twitter.com/YXQoAFFLjS
या सेलिब्रिटींनी घेतला भारत जोडो यात्रेत सहभाग
मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. पूजा भट, रश्मी देसाई, अमोल पालेकर, रिया सेन, आकांक्षा पुरी, सुशांत सिंह आणि मोना आंबेगावकर या कलाकारांनी सहभाग घेतला. या सेलिब्रिटींचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही नेटकऱ्यांनी या सेलिब्रिटींना ट्रोल केलं आहे तर काहींनी या सेलिब्रिटींना पाठिंबा दिला.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Bharat Jodo Yatra: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा उज्जैनमध्ये; अभिनेत्री स्वरा भास्कर झाली सहभागी