Bhairavi Vaidya: ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन; वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Bhairavi Vaidya: अभिनेत्री भैरवी वैद्य (Bhairavi Vaidya) यांचे निधन झाले आहे. भैरवी या गेल्या सहा महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या.
Bhairavi Vaidya: प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री भैरवी वैद्य (Bhairavi Vaidya) यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जवळपास, 45 वर्ष त्या मनोरंजनक्षेत्रात काम करत होत्या. भैरवी या गेल्या सहा महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. भैरवी वैद्य यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
भैरवी यांनी 'या' चित्रपटांमध्ये केलं काम
गुजराती आणि हिंदी चित्रपटांमध्ये भैरवी यांनी काम केलं. नीमा डेन्जोंगपा या मालिकेमध्ये त्यांनी पुष्पा ही भूमिका साकारली. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच चोरी चोरी चुपके चुपके या सलमान खानच्या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केले होते. ऐश्वर्या राय बच्चनच्या ताल या चित्रपटामधील जानकी ही भूमिका साकारून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘व्हॉट्स योर राशी’, ‘हमराज’, ‘क्या दिल ने कहा’ या चित्रपटांमध्ये देखील भैरवी वैद्य यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
कलाकारांनी व्यक्त केला शोक
भैरवी यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात भैरवी यांच्यासोबत प्रतीक गांधीनं काम केलं. भैरवी यांच्या निधनानंतर प्रतीकनं भैरवी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. त्यानं सांगितलं, " व्हेंटिलेटर चित्रपटात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. आमच्यात खूप छान बॉन्डिंग होते. मी त्यांना माझ्या लहानपणापासून टीव्हीवर पाहत आलो आहे. त्यांचा हसरा चेहरा मी कधीच विसरू शकत नाही.
View this post on Instagram
तसेच भैरवीबद्दल बोलताना त्यांच्यासोबत काम केलेला कलाकार बाबुल भावसारने एका वृत्तसंस्थेला सांगितलं, "काही वर्षांपूर्वी मी त्यांच्यासोबत एका नाटकामध्ये केलं होतं. त्या खूप छान व्यक्ती होत्या आणि त्यांच्या नाटकातील पात्रंही तशीच होती. खऱ्या आयुष्यात त्यांचे कुणाशी भांडण झालं तरी त्या फक्त प्रेमानेच बोलत होत्या असं वाटत होतं."
इतर महत्वाच्या बातम्या: