Bhagya Dile Tu Mala : कोण घेणार माघार? राजवर्धन की रत्नमाला? 'भाग्य दिले तू मला' मालिकेचा रंगणार विशेष भाग
Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' या मालिकेचा आज विशेष भाग रंगणार आहे.
![Bhagya Dile Tu Mala : कोण घेणार माघार? राजवर्धन की रत्नमाला? 'भाग्य दिले तू मला' मालिकेचा रंगणार विशेष भाग Bhagya Dile Tu Mala Marathi Serial Latest Update Know Television Entertainment Latest Update Bhagya Dile Tu Mala Serial Special Episode Today On Air Bhagya Dile Tu Mala : कोण घेणार माघार? राजवर्धन की रत्नमाला? 'भाग्य दिले तू मला' मालिकेचा रंगणार विशेष भाग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/03/a283d31441a3d3d23127af64388e21ec1701573479635254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile Tu Mala) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेच्या आगामी भागाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'भाग्य दिले तू मला' या मालिकेचा आज विशेष भाग रंगणार आहे.
'भाग्य दिले तू मला' मालिकेचा रंगणार विशेष भाग
'भाग्य दिले तू मला' मध्ये आई मुलाचा वाद टोकाला पोहोचला आहे. तत्त्वनिष्ठ असलेली रत्नमाला आणि वडिलांच्या न्याय हक्कासाठी लढणारा राजवर्धन हे या वादाचं कारण आहे. 20 वर्षांनंतर परत आलेले वडिलांना भूतकाळात काही गोष्टींचा सामना करावा लागला होता याला कारणीभूत होती आई म्हणजेच रत्नमाला म्हणून आईवर असलेला राग तसेच इतक्या वर्ष वडिलांना काय झालं होतं? ते कुठे होते? हे रत्नमालाने मुलापासून लपवलेलं त्यामुळे द्विगुणीत झालेला राग. त्यासाठीच राजवर्धनने घेतलेली वडिलांची बाजू जी एका दृष्टीने अयोग्य ही असू शकते.
20 वर्ष ज्या माणसाचा जगाशी संबंध नव्हता त्याच माणसाच्या हातात प्रसिद्ध माहेरचा चहाचा बिझनेस सोपवणं रत्नमालाला योग्य वाटत नाही. आता राजवर्धन वडिलांसाठी आईशी लढतो आहे हे योग्य आहे की रत्नमाला तिच्या तत्वांशी तडजोड नकरता पुढे जातेय व अनिरुद्धला माहेरचा चहा मध्ये पदवी देण्यास विरोध करते हे योग्य आहे? यापैकी आता कोण जिंकणार? दोघांपैकी कोण माघार घेणार? हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.
View this post on Instagram
आता या सगळ्या पार्श्वभूमीवर कावेरी कोणाची बाजू घेईल? राजवर्धनने याआधी ही तिला विचारले होते की तुला आईची साथ द्यायची की माझ्यासोबत येणार आहेस? आणि एकीकडे तिने रत्नमालाला वचन दिलं आहे की काही ही झालं तरी मी घर तुटू देणार नाही. पण कावेरीने समतोल सांभाळत ठरवलं आहे की या घरातल्या सगळ्या मंडळींसोबत असेल. या आई-मुलाच्या वादात कावेरी कसं सगळं संभाळून हे कुटुंब परत आणते, त्यासाठी तिला काय काय संकटांना सामोरं जाव लागले हे पाहण्यासाठी मालिकाप्रेमींना आजचा विशेष भाग पाहायला लागेल.
'भाग्य दिले तू मला'चा रंगणार विशेष भाग
'भाग्य दिले तू मला' या मालिकेच्या विशेष भागांची चाहत्यांच्या उत्सुकता आहे. हा विशेष भाग मालिकाप्रेमींना 3 डिसेंबर दुपारी 1 वाजता आणि रात्री 8 वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे. राजवर्धनच्या प्रश्नाला रत्नमाला काय उत्तर देणार हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या
Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' मालिकेत नवा ट्विस्ट; रत्नमाला मोहितेचा भूतकाळ येणार समोर!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)