एक्स्प्लोर

Salman Khan And Shahrukh Khan: आधी शाहरुख नाहीतर 'या' सुपरस्टारला होती, मन्नत खरेदी करण्याची ऑफर; पण वडिलांमुळे नकार दिला अन् नंतर पश्चाताप झाला

Salman Khan And Shahrukh Khan: शाहरुख खानचं आलिशान घर मन्नत... आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण शाहरुखच्या आधी मन्नत खरेदी करण्याची ऑफर दुसऱ्या एका सुपरस्टारला मिळाली होती. पण, केवळ वडिलांनी नकार दिल्यामुळे त्या सुपरस्टारचं मन्नत खरेदी करण्याचं स्वप्न अधुरं राहिलं...

Salman Khan And Shahrukh Khan: बॉलिवूड (Bollywood) आणि तीन खान... हे समीकरण तसं फार जुनं. ज्या-ज्या वेळी बॉलिवूडच्या तीन खान्सचा विषय येतो. तेव्हा क्षणार्धात शाहरुख खान (Shahrukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) ही तीन नावं समोर येतात. फार आधी या तिन्ही खान्सनी एकमेकांसोबत स्क्रिन शेअर देखील केली आहे. पण, त्यानंतर काहीतरी वितुष्ट आल्यामुळे यांचं गुळपीठ फिस्कटल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. खासकरुन सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वादाच्या चर्चा तर सर्वश्रुत आहेतच... पण काही काळानं दोघांमधील वाद मिटला आणि दोघांमधील मैत्री पुन्हा सगळ्यांनी पाहिलीच. बॉलिवूडचा दबंग भाईजान शाहरुख खानचा खूप मानतो, अशा चर्चा नेहमीच बॉलिवूडमध्ये असतात. काही दिवसांपू्र्वी आलेला शाहरुख खानच्या पठाण चित्रपटात सलमान खाननं जबरदस्त कॅमियो देखील केला होता. एका इंटरव्यूमध्ये बोलताना शाहरुख खानबाबत सलमानला एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी सलमान खाननं जे उत्तर दिलं, त्यानं सर्वजण हैराण झाले होते. 

सलमानला हवा होता शाहरुखचा बंगला 

एका मुलाखतीत बोलताना सलमान खानला शाहरुखबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. शाहरुख खानकडे अशी कोणती गोष्ट आहे, जी तुम्हाला तुमच्याकडे हवी आहे? यावर सलमान खान म्हणाला की, शाहरुख खानचा बंगला कम ऑफिस असलेला मन्नत. त्यावेळी सलमाननं सांगितलं की, शाहरुख खानच्या आधी मन्नत खरेदी करण्याची ऑफर सलमान खानला आली होती. त्यावेळी सलमान खान करिअरच्या सर्वोच्च शिखरावर होता. पण, त्यावेळी सलमान खानचे वडील सलीम खान म्हणाले की, तू एवढ्या मोठ्या घराचं करणार काय? त्यानंतर सलमान खाननं ऑफर नाकारली आणि त्यानंतर शाहरुख खाननं मन्नत खरेदी केला. मुलाखतीत बोलताना सलमान खान म्हणालेला की, मला जे माझ्या वडिलांनी विचारलेलं तेच मला शाहरुख खानला विचारायचं आहे की, तू एवढ्या मोठ्या घरात नेमकं करतो काय? 

आठ चित्रपटांमध्ये एकत्रच दिसले शाहरुख, सलमान 

करण अर्जुनमध्ये सलमान खान आणि शाहरुख खान या दोघांनीही अप्रतिम काम केलं आहे. यानंतर दोघेही अनेक वर्षे एकमेकांपासून दूर राहिले, दोघांमध्येही अबोला होता. पण त्यानंतर दोघे पुन्हा एकत्र आले. करण अर्जुन व्यतिरिक्त शाहरुख आणि सलमान हम तुम्हारे हैं सनम, कुछ कुछ होता है, हर दिल जो प्यार करेगा, ओम शांती ओम, ट्यूबलाईट, शून्या आणि पठाण या चित्रपटात एकत्र दिसले आहेत. करण, अर्जुनमध्ये दोघेही लीड रोलमध्ये होते. याशिवाय सर्व चित्रपटांमध्ये दोघेही एकमेकांसोबत कॅमिओ भूमिकेत दिसले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shah Rukh Khan : मन्नतबाहेर 95 दिवस वाट पाहणाऱ्या फॅनला शाहरुखचं इतक्या रुपयांचं जबरा गिफ्ट, आर्यनच्या पदार्पणाविषयीही दिली मोठी अपडेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरीचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरीचं चॅलेंज 
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरीचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरीचं चॅलेंज 
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget