Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'ची 25 दिवसांत 66.61 कोटींची भरारी! लवकरच पार करणार 100 कोटींचा टप्पा
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' या मराठी सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे.
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होऊन 25 दिवस पूर्ण झाले असून आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. जोरदार प्रमोशन आणि माउथ पब्लिसिटीच्या जोरावर हा सिनेमा दिवसेंदिवस चांगलीच कमाई करत आहे. एकीकडे 'ओपनहाइमर' (Oppenheimer) आणि 'बार्बी' (Barbie) सारखे हॉलिवूड सिनेमे धमाका करत असताना 'बाईपण भारी देवा'देखील चांगली कमाई करत आहे.
'बाईपण भारी देवा' हा सिनेमा 30 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. मराठी सिनेप्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळवण्यात हा सिनेमा यशस्वी झाला. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने (Baipan Bhari Deva Opning Day Collection) 1.5 कोटींची कमाई केली. पहिल्या आठवड्यात 12.4 कोटींची कमाई केली. दुसरा आठवडा 24.95 कोटी आणि तिसरा आठवडा 21.24 कोटींची कमाई केली. रिलीजच्या 25 दिवसांत या सिनेमाने 66.61 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'बाईपण भारी देवा'ची वाटलाच 100 कोटींच्या दिशेने
'बाईपण भारी देवा'ने रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. लवकरच हा सिनेमा रितेश देशमुखच्या 'वेड' आणि नागराज मंजुळेच्या 'सैराट'चा रेकॉर्ड ब्रेक करू शकतो. अनेक प्रेक्षक पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत. त्यामुळे लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करेल.
'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या रिलीजआधीच प्रेक्षकांमध्ये सिनेमाबद्दलची उत्सुकता पहायला मिळाली होती. बॉक्सऑफिसवर हा सिनेमा कमाल करेल अशी चर्चाही रंगली होती आणि आता याच अपेक्षेवर खरं उतरत या सिनेमाने केवळ 25 दिवसांत केलेली 66.61 कोटींची कमाई केली आहे.
'बाईपण भारी देवा'च्या कलेक्शनचं चित्र पाहता या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला आलेली मरगळ झटकून फेकून दिली असल्याची चर्चा रंगलेली दिसत आहे. नऊवारी साडी आणि गॉगल लावून अनेक महिला सिनेमा पाहताना दिसत आहेत. महिलांसह तरुण आणि पुरुषवर्गही मोठ्या प्रमाणात हा सिनेमा पाहायला जात आहेत. सर्व वयोगटातील महिलांना हा सिनेमा भावला आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'बाईपण भारी देवा'!
'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सांभाळली आहे. रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar), सुकन्या मोने (Sukanya Mone) आणि दीपा परब (Deepa Parab) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
'बाईपण भारी देवा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Baipan Bhaari Deva Box Office Collection)
DAY | COLLECTION |
पहिला दिवस | 1.5 कोटी |
दुसरा दिवस | 2.2 कोटी |
तिसरा दिवस | 3.2 कोटी |
चौथा दिवस | 1 कोटी |
पाचवा दिवस | 1.45 कोटी |
सहावा दिवस | 1.8 कोटी |
सातवा दिवस | 1.6 कोटी |
आठवा दिवस | 2.35 कोटी |
नववा दिवस | 5.4 कोटी |
अकरावा दिवस | 2.78 कोटी |
बारावा दिवस | 2.88 कोटी |
तेरावा दिवस | 2.7 कोटी |
चौदावा दिवस | 2.79 कोटी |
पंधरावा दिवस | 2.6 कोटी |
सोळावा दिवस | 5.15 कोटी |
सतरावा दिवस | 5.75 कोटी |
अठरावा दिवस | 2.2 कोटी |
एकोणिसावा दिवस | 2.1 कोटी |
विसावा दिवस | 2 कोटी |
एकविसावा दिवस | 1.44 कोटी |
बावीसावा दिवस | 1.20 कोटी |
तेवीसावा दिवस | 2.46 कोटी |
चोवीसावा दिवस | 3.36 कोटी |
पंचवीसावा दिवस | 1 कोटी |
संबंधित बातम्या