Sikander : भाईजानच्या सिकंदर चित्रपटात बाहुबली फेम अभिनेत्याची एन्ट्री, महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार
Salman Khan Sikander Movie : सलमान खानच्या सिकंदर चित्रपटात बाहुबली फेम सत्यराज झळकणार आहे.
Salman Khan Sikander Movie : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या आगामी 'सिकंदर' चित्रपटामध्ये (Sikander Movie) व्यस्त आहे. भाईजानचे चाहते सलमान खानच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर (Sikander Movie First Poster) समोर आलं होतं. सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाची शूटींग सुरु झाल्याचं सांगितलं होतं. यानंतर चाहत्यांची उत्कंठा शिगला पोहोचली आहे. अशातच आता या चित्रपटात 'बाहुबली' (Bahubali) फेम अभिनेत्याची एन्ट्री झाल्याची मोठी अपडेट समोर आली आहे.
सिकंदर चित्रपटात बाहुबली फेम अभिनेत्याची एन्ट्री
सलमान खानने काही दिवसांपूर्वी चाहत्यांसोबत आगामी चित्रपटातील लूक शेअर केला होता. भाईजानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन 'सिकंदर' चित्रपटातील कूल लूक शेअर केला होता. सलमान खानने फर्स्ट लूकचा फोटो शेअर केल्यापासून चाहत्यांच्या मनातील या चित्रपटासाठीची उत्सुकता आणखी वाढली आहे. सिकंदर चित्रपट ईदच्या दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेता सत्यराज महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार
सिकंदर चित्रपटात अभिनेता सत्यराज 'बाहुबली' चित्रपटातील अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे 'बाहुबली' फेम कटप्पा म्हणजे अभिनेते सत्यराज हे सिंकदर चित्रपटात झळकणार आहे. नाडियाडवाला इंटरटेंनमेंटने एक्स मीडिया अकाऊंटवर याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
प्रतिक बब्बरही सलमानच्या चित्रपटात दिसणार
अभिनेता प्रतिक बब्बर देखील या चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये सामील झाले आहेत. साजिद नाडियाडवाला निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदोस करत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सध्या मुंबईत सुरु आहे. साजिद नाडियादवालाची पत्नी वर्धा खान नाडियादवाला सेटवरील अनेक फोटो पोस्ट करून चाहत्यांना सतत अपडेट देत असते. याशिवाय साजिद नाडियादवालानेही हेच फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना नाडियाडवाला ग्रँडसन्सने लिहिलं आहे की, 'सत्यराज सर, तुमचं स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. टीम सिकंदरमध्ये तुम्हाला असल्याचा आम्हाला अभिमान आहे. प्रतिक बब्बरसोबत पुन्हा एकदा काम करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. मोठ्या पडद्यावर सिनेमाचा धमाका अनुभवण्यासाठी आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :