एक्स्प्लोर
'बाहुबली 2' चा 9 मिनिटांचा पार्ट लीक, एकाला अटक
हैदराबाद : बहुप्रतिक्षित ‘बाहुबलीः दी कन्क्लुझन’ या सिनेमाचा तब्बल 9 मिनिटांचा पार्ट लीक झाला आहे. एडिटिंग टीममधील एकाने हा पार्ट लीक केल्याची माहिती आहे. निर्मात्यांनी या प्रकरणी पोलिसात धाव घेतली आहे.
आंध्रप्रदेशातल्या विजयवाडा येथून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होऊ नये, यासाठी निर्माते युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
सिनेमातील मुख्य अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्यातील एक सीन लीक झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. बाहुबलीने कटप्पाला का मारलं, या प्रश्नाचं उत्तर या पार्टमध्ये असल्याचं बोललं जात आहे. ‘बाहुबलीः दी कन्क्लुझन’ हा 'बाहुबली' या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सिक्वेल आहे.
सिनेमाचा अभिनेता प्रभास याच्या जन्मदिनी नुकतंच या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. 28 एप्रिल 2017 रोजी हा सिनेमा भारतात रिलीज होणार आहे. एस. एस. राजामौली यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
शिक्षण
पुणे
Advertisement