(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bad Newz : विक्की-तृप्तीच्या 27 सेकंदांच्या Kissing सीनमध्ये बदल, बॅड न्यूज चित्रपटावर सेन्सॉरची कात्री
Bad Newz Kissing Scene Modify : विक्की कौशलच्या बॅड न्यूज चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली असून 27 सेकंदांच्या लिप-लॉक सीनमध्ये बदल करण्यास सांगितलं आहे.
मुंबई : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याचा आगामी बॅड न्यूज (Bad Newz) चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विक्की कौशलसोबत तृप्ती डिमरी आणि एमी विर्क हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. विक्की कौशलच्या बॅड न्यूज चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील 27 सेकंदांच्या लिप-लॉक सीनमध्ये (Lip Lock Scne) बदल करण्यास सांगितलं आहे. (Censor Board on Bad Newz)
'बॅड न्यूज' चित्रपटावर सेन्सॉरची कात्री
विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांचा बॅड न्यूज हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच सेन्सॉर बोर्डाच्या कैचीत सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या 27 सेकंदाच्या चुंबन दृश्यात (Kissing Scene) बदल करण्यास सांगितलं आहे. ही दृश्ये विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांच्यातील तीन वेगवेगळे किसिंग सीन आहेत. एक दृश्य 9 सेकंदाचा, दुसरा 10 सेकंदाचा आणि तिसरा 8 सेकंदांचा होता, अशा एकूण 27 सेकंदाच्या किसिंग सीनमध्ये बदल करण्यास सांगण्यात आलं आहे.
View this post on Instagram
विकी-तृप्तीच्या 27 सेकंदांच्या किसिंग सीनमध्ये बदल
बॅड न्यूज चित्रपट रिलीज होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. यापूर्वी, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) या चित्रपटात काही बदल करण्यास सांगितलं आहे. बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, विकी आणि तृप्ती यांच्यातील तीन किसिंग सीनला सेन्सॉर केलं आहे, दरम्यान ऑडिओ हटवण्यात आलेला नाही. चित्रपटात तीन लिप-लॉक सीन आहेत, यामधील एक 9 सेकंदांचा, दुसरा 10 सेकंदांचा आणि तिसरा 8 सेकंदांचा आहे. अशा प्रकारे सेन्सॉर बोर्डाने या तीन दृश्यांमध्ये बदल केले आहेत, जे एकूण 27 सेकंद आहेत, असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
बॅड न्यूज चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच बदल
मीडिया रिपोर्टनुसार, सेन्सॉर बोर्डाने बॅड न्यूज चित्रपटाला या 27 सेकंदांच्या चुंबन दृश्ये कट करण्याऐवजी त्यामध्ये बदल करण्यास सांगितलं आहे. आता हे पाहणे मनोरंजक आहे की, निर्माते या लिप-लॉक सीन्समध्ये कशाप्रकारे बदल केला आहे. याशिवाय, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या सुरुवातीला डिस्क्लेमर बदलण्यास सांगितलं असून त्यासोबतच अल्कोहोलविरोधी संदेशाचा फॉन्ट आकार वाढवण्यास सांगितलं आहे. या बदलांनंतरच चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून U/A प्रमाणपत्र मिळालं. यानंतर संपूर्ण चित्रपट 2 तास 22 मिनिटांचा असल्याचं सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :