एक्स्प्लोर
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शेतकरी कर्जमाफीच्या (Farmer Loan Waiver) मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले आहे. 'चालू वर्षाच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, जो शेतकरी थकबाकीदार होणार आहे त्याच्यासाठी लढलेच पाहिजे,' असे स्पष्ट मत बच्चू कडू यांनी मांडले आहे. त्यांनी ९ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयाचा (Government Resolution) उल्लेख करत, या निर्णयामुळे सक्तीच्या वसुलीला नव्हे, तर थेट 'वसुलीला' स्थगिती मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळातील २०१७ च्या कर्जमाफीचे १७३ कोटी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारच्या काळातील २०१९ च्या महात्मा फुले कर्जमाफीचे ३३ कोटी रुपये अजूनही अमरावती जिल्हा बँकेला मिळालेले नाहीत, असा दावाही त्यांनी केला. थकबाकीदार शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी कर्ज मिळावे आणि चालू वर्षातील शेतकऱ्यांचा कर्जमाफीत समावेश व्हावा, या दोन प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याचे संकेत कडू यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















