(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Isha Koppikar : दिग्गज अभिनेत्याने एकटीला भेटायला बोलावलं, 18 व्या वर्षी कास्टिंग काऊचचा सामना; ईशा कोप्पीकरने सांगितला 'तो' भयानक अनुभव
Casting Couch Experience : अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव शेअर केला आहे.
Isha Koppikar Shared Casting Couch Experience : फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक वेळा कास्टिंग काऊच (Casting Couch) हा विषय चर्चेत येतो. अभिनेत्री ईशा कोप्पीकर (Isha Koppikar) हिने तिच्यासोबतचा कास्टिंग काऊचचा किस्सा सांगितला आहे. अभिनेत्री ईशा कोप्पीकर अलिकडेच दिग्दर्शित झालेल्या अयलान (Ayalaan) या तमिळ चित्रपटात झळकली आहे. अलिकडेच ईशा कोप्पीकरने एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव शेअर केला आहे.
ईशा कोप्पीकरने सांगितला भयानक अनुभव
अभिनेत्री ईशा कोप्पीकरने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला आहे. तिने सांगितलं की, मी तो काळ पाहिला आहे, जेव्हा अभिनेते आणि दिग्दर्शकांचे सेक्रेटरी चुकीच्या पद्धतील स्पर्श करायचे आणि हात घट्ट धरायचे, दाबायचे. सर्व काही फक्त ते ठरवायचे आणि आम्हाला फक्त आदेशांचे पालन करायला सांगितलं जायचं.
दिग्गज अभिनेत्याने एकटीला भेटायला बोलावलं
ईशा कोप्पीकरने अलीकडेच हिंदी चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काऊवर भाष्य केलं आहे. कास्टिंग काउचचा अनुभव सांगताना ईशा भावूक झाली. इंडस्ट्रीत त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. ईशाला 18 व्या वर्षी कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. ईशा कोप्पीकरने 'इश्क समुद्र' आणि कंपनीच्या 'खल्लास' यांसारख्या आयटम नंबर्समध्ये अभिनय केल्यानंतर फिजा चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अयलान चित्रपटात रकुलप्रीत सिंह, शिवकार्तिकेयन, शरद केळकर यांच्यासह ईशा कोप्पीकर दमदार भूमिकेमध्ये दिसत आहे.
कास्टिंग काउचसाठी सचिवांनी संपर्क साधला होता
ईशा कोप्पीकरने सांगितलं की, मला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. कास्टिंग काउचसाठी एका सेक्रेटरी आणि अभिनेत्याने माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मी 18 वर्षांची होते. त्याने मला सांगितले की, काम मिळवण्यासाठी कलाकारांशी मैत्री करावी लागेल. मी खूप फ्रेंडली आहे, पण मैत्रीचा अर्थ काय? मी इतकी फ्रेंडली होते की एकदा एकता कपूरने मला थोडं अॅरोगंट वागायला सांगितलं होतं.
ए-लिस्ट अभिनेत्याने एकट्याला भेटायला बोलावलं
ईशाने पुढे सांगितलं की, एकदा एका ए-लिस्ट अभिनेत्याने तिला एकटे भेटायला बोलावलं होतं. ईशाने याबाबत खुलासा करताना सांगितलं की, 'मी 23 वर्षांची असताना एका अभिनेत्याने मला माझा ड्रायव्हर किंवा इतर कोणत्याही व्यक्तिशिवाय भेटायला बोलावलं. त्याचे इतर अभिनेत्रींसोबत संबंध असल्याच्या अफवा होत्या. त्यावर तो म्हणाला की, लोक अफवा पसरवतं आहेत. पण मी जाण्यास नकार दिला आणि मी एकटी येऊ शकत नाही, असं सांगितले. तो हिंदी चित्रपटसृष्टीतील ए-लिस्ट अभिनेता होता.