एक्स्प्लोर
दोन दिवसात 'अॅव्हेंजर्स एंडगेम'ची भारतात छप्परफाड कमाई, बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडीत
बहुप्रतीक्षित हॉलिवूडपट 'अॅव्हेंजर्स एंडगेम' शुक्रवारी (26 एप्रिल) रोजी भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने दोनच दिवसात छप्परफाट कमाई केली आहे.
मुंबई : बहुप्रतीक्षित हॉलिवूडपट 'अॅव्हेंजर्स एंडगेम' शुक्रवारी (26 एप्रिल) रोजी भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने दोनच दिवसात छप्परफाट कमाई केली आहे. शुक्रवार आणि शनिवारी दोन्ही दिवशी चित्रपटाने 50 कोटींहून अधिक कमाई करत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा करीष्मा आतापर्यंत कोणत्याही हॉलिवूडपटाला करता आलेला नाही.
'अॅव्हेंजर्स एंडगेम' हा भारतात हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला आहे. हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या 'अॅव्हेंजर्स एंडगेम' 104.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर इतर भाषांमधील बॉक्स ऑफिसवरी कमाई त्यामध्ये मिळवली तर या चित्रपटाची दोन दिवसातील कमाई ही 124 कोटी रुपये इतकी आहे.
दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याच्या बाहुबली आणि बाहुबली 2 या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड 'अॅव्हेंजर्स एंडगेम'ने मोडीत काढले आहेत. बाहुबलीला 100 कोटी रुपयांची कमाई करण्यासाठी तीन दिवस लागले होते. तर बाहुबली 2 ने दोन दिवसात 100 कोटी रुपये कमावले होते.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार 'अॅव्हेंजर्स एंडगेम'ने पहिल्या दिवशी (शुक्रवारी) तब्बल 53.10 कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 51.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दोन दिवसात या चित्रपटाने 104.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट भारतात 2845 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. बिग बजेट हिंदी बॉलिवूडपट हे साधारण 4000 किंवा त्यापेक्षा अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होता. एंडगेमला त्या तुलनेत खूप कमी चित्रपटगृह मिळाली आहेत.
#AvengersEndgame is rewriting record books... Puts up a HISTORIC total on Day 2... Eyes ₹ 150 cr+ weekend... No biggie from *Hindi* film industry has achieved the target so far... Fri 53.10 cr, Sat 51.40 cr. Total: ₹ 104.50 cr Nett BOC. India biz. Gross BOC: ₹ 124.40 cr.
— taran adarsh (@taran_adarsh) April 28, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement