Avatar 2 Trailer Out: निळ्या विश्वाची जादू, ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित
'अवतार: द वे ऑफ वॉटर' (Avatar: The Way Of Water) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमधील व्हीएफएक्सचं अनेक जण कौतुक करत आहेत.

Avatar: The Way Of Water: जेम्स कॅमेरून (James Cameron) यांनी दिग्दर्शित केलेला 'अवतार' (Avatar) हा हॉलिवूड चित्रपट 2009 मध्ये रिलीज झाला हा चित्रपट जगभरातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. 'अवतार' चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर जगभरातील प्रेक्षक या चित्रपटाच्या सीक्वलची वाट पाहत होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'अवतार: द वे ऑफ वॉटर' (Avatar: The Way Of Water) या चित्रपटाचा नवा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
अवतार रिलीज झाल्यानंतर आता 13 वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं नाव 'अवतार: द वे ऑफ वॉटर' असं आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. अवतारच्या या सिक्वेलमध्ये पहिल्या पार्टमध्ये दाखवण्यात आलेल्या गोष्टीचा पुढील भाग दाखवण्यात येणार आहे. यामध्ये ‘सुली परिवार’यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दाखवण्यात येणार आहेत.या अडचणींचा सामना ते कसे करतात हे देखील 'अवतार: द वे ऑफ वॉटर' मध्ये दाखवण्यात येईल.
पाहा ट्रेलर
'अवतार: द वे ऑफ वॉटर' च्या ट्रेलरमध्ये दिसरणाऱ्या व्हीएफएक्सचं अनेक जण कौतुक करत आहेत. हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'अवतार: द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट भारतात इंग्रजी आणि हिंदी तसेच तमिळ, तेलगू आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे.
अवतार-2 म्हणजेच 'अवतार: द वे ऑफ वॉटर' नंतर अवतार-3 हा चित्रपट रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. अवतार-3 चं नाव 'द सिड बेअरेर' असं असणार आहे. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच अवतार 4 हा चित्रपट देखील 18 डिसेंबर 2026 रोजी रिलीज होणार असून या चित्रपटाचं नाव 'द कुलकून रायडर' असं असणार आहे. तर अवतार-5 चित्रपटाचं नाव the quest for eywa असं असणार आहे.हा चित्रपट 22 डिसेंबर 2028 रोजी प्रदर्शित होणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Avatar 2 : एक-दोन नव्हे 'अवतार'चे तब्बल चार सिक्वेल येणार, प्रत्येकात दिसणार निळ्या विश्वाची जादू!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
