एक्स्प्लोर

Autograph Teaser:  ‘ऑटोग्राफ’ चित्रपटाचा टीझर रिलीज; अंकुश चौधरी, अमृता खानविलकर अन् उर्मिला कोठारे प्रमुख भूमिकेत

अंकुश चौधरीसह अमृता खानविलकर, उर्मिला कोठारे आणि मानसी मोघे हे कलाकार ऑटोग्राफ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

Autograph Teaser:  एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या बहुप्रतीक्षित ‘ऑटोग्राफ’चा (Autograph) टीजर प्रदर्शित झाला आहे. प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सतीश राजवाडे (Satish Rajwade) यांची ही सांगीतिक प्रेमकथा 30 डिसेंबर 2022 रोजी राज्यभरात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाली आहे. शनिवारी प्रदर्शित झालेल्या टीझरच्या माध्यमातून या चित्रपटातील महत्त्वाच्या काही प्रसंगांबरोबरच प्रतिभावान अभिनेत्यांचा सहभाग समोर येतो आणि रसिकांच्या या चित्रपटाकडून असेलेल्या अपेक्षा आणखी वाढतात.

या टीझरमध्ये अंकुश चौधरीसह अमृता खानविलकर, उर्मिला कोठारे आणि मानसी मोघे काही महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये दिसतात. त्यातून ही एक सांगीतिक प्रेमकथा आहे आणि तिला विरहाची किनार आहे, हे ध्यानात येते.टीझरमधून जे समोर येते ते हे कि ही काही केवळ एक प्रेमकथा नाही तर त्यापेक्षाही बरेच काही आहे.‘ऑटोग्राफ’ ही नातेसंबंधांवर बेतलेली कहाणी आहे. ती काहीशी गुंतागुंतीची, बहुआयामी आणि शेवटी हवीहवीशी वाटणारी अशी ही कथा आहे... प्रेम कमी होवू शकते पण नाती आयुष्यभाराची असतात. काही माणसे अपघाताने भेटतात, पण मग आपलीशी होतात आणि तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. आपण जे आहोत ते होण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो...”  ‘ऑटोग्राफ’या नावाचा कथेशी काय संबंध, याबाबत टीझरमध्ये पुरेशी माहिती मिळत नाही, पण त्याचे महत्व मात्र टीझर अधोरेखित करतो.

‘ऑटोग्राफ’शी चित्रपटसृष्टीतील दोन महत्त्वाची नावे जोडली गेली आहेत, दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि चित्रपटाचे निर्माते एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट. मुंबई-पुणे-मुंबई ही चित्रपट मालिका, प्रेमाची गोष्ट, ती सध्या काय करते... या प्रेमकथांमुळे सतीश राजवाडे हे नाव सर्वश्रुत झाले आहे तर एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे यापूर्वीचे चित्रपट त्यांच्या यशाची गाथा अधोरेखित करतात. ‘ऑटोग्राफ’या नावांमुळे अपेक्षा उंचावून गेला आहे आणि रसिकांमध्ये त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना राजवाडे म्हणाले, “या चित्रपटामध्ये आपल्या प्रियजनांना एकत्र आणण्याची ताकद आहे. आपल्या आयुष्यात ज्यांचा अविभाज्य सहभाग होता त्यांची आठवण चित्रपट करून देतो. हा चित्रपट अशा व्यक्तींबद्दल आहे की ज्यांनी आपल्या आयुष्याला वळण दिले आहे आणि एखाद्या ‘ऑटोग्राफ’प्रमाणे आपल्या आयुष्यावर अनोखी अशी छाप पडली आहे. आपल्या प्रत्येकाची स्वतःची अशी एक प्रेमकथा असते आणि त्यातील काही या अव्यक्त असतात तर काही छुप्या असतात. मनाच्या कोपऱ्यात खोलवर त्यांना स्थान असते, आणि त्या आपल्या हृदयाच्या खूप जवळ असतात. ‘ऑटोग्राफ’ आपल्याला या सर्व प्रिय क्षणांची आठवण करून देईल. चित्रपटात आनंदाचे अनेक क्षण आणि दुःखाची झालर असलेल्या अनिवार्य अशा क्षणांची आठवण करून देतो. पण सरतेशेवटी, ही हृदयाला भिडणारी एक कथा असून आपल्यातील प्रत्येकजण ती आयुष्यभर जपून ठेवेल अशी आहे.”

“ही कथा एकमेवाद्वितीय अशी आहे. प्रेक्षकांच्या मनावर ती खोलवर अनोखा असा परिमाण कोरून ठेवेल,” असे उद्गार चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया यांनी काढले. ते पुढे म्हणतात, “याचे बरेचसे श्रेय हे चित्रपटाचे प्रतिभावान दिग्दर्शक सतीश राजवाडे यांना जाते कारण त्यांनी सातत्याने दर्जेदार काम केले आहे. त्याशिवाय चित्रपटाची कथा दमदार आहे आणि यातील कलाकारांनी उत्तम असे काम केले आहे. त्यामुळे चित्रपट एका विशिष्ट उंचीवर गेला आहे. दर्जेदार निर्मितीसाठी जे करणे गरजेचे होते ते सर्व आम्ही केले आहे. आता चित्रपट प्रेक्षकांसमोर घेवून जाण्याची प्रतीक्षा करतो आहोत. ते आम्हाला भरपूर प्रतिसाद देतील असा पूर्ण विश्वास आहे.”

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने यापूर्वी अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुंबई-पुणे-मुंबई, वेडिंगचा शिनेमा, बापजन्म, आम्ही दोघी, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाइमपास आदी चित्रपटांचा त्यात समावेश आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 23 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : लोकसभा निवडणुकीत भाजपला 370 जागा मिळाल्या नाहीत तर..., प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
Prashant Kishor : लोकसभा निवडणुकीत भाजपला 370 जागा मिळाल्या नाहीत तर..., प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शेअर बाजारात तेजी? ONGC चा शेअर रॉकेटप्रमाणे धावणार?
मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शेअर बाजारात तेजी? ONGC चा शेअर रॉकेटप्रमाणे धावणार?
Bigg Boss Marathi 5 Latest Update Apurva Nemlekar : रितेशची  मराठी 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री; शेवंताची कमेंट चर्चेत म्हणाली, 'इसको बोलते है....'
रितेशची मराठी 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री; शेवंताची कमेंट चर्चेत म्हणाली, 'इसको बोलते है....'
मोठी बातमी! मुंबईतील मतदान घोळाची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना आदेश
मोठी बातमी! मुंबईतील मतदान घोळाची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना आदेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai North East Lok Sabha : गॅस 600 चा 1200 झालाय ठिके, लोकांची इन्कम वाढलीये का?ABP Majha Headlines :  03 PM : 21 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSouth Mumbai Lok Sabha Voters Reaction : मतदान केंद्रावर ढिसाळ नियोजन, दक्षिण मुंबईचे मतदार संतप्तAmitesh Kumar on Pune Car Accident : दुर्दैवाने कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले- अमितेश कुमार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Kishor : लोकसभा निवडणुकीत भाजपला 370 जागा मिळाल्या नाहीत तर..., प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
Prashant Kishor : लोकसभा निवडणुकीत भाजपला 370 जागा मिळाल्या नाहीत तर..., प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शेअर बाजारात तेजी? ONGC चा शेअर रॉकेटप्रमाणे धावणार?
मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शेअर बाजारात तेजी? ONGC चा शेअर रॉकेटप्रमाणे धावणार?
Bigg Boss Marathi 5 Latest Update Apurva Nemlekar : रितेशची  मराठी 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री; शेवंताची कमेंट चर्चेत म्हणाली, 'इसको बोलते है....'
रितेशची मराठी 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री; शेवंताची कमेंट चर्चेत म्हणाली, 'इसको बोलते है....'
मोठी बातमी! मुंबईतील मतदान घोळाची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना आदेश
मोठी बातमी! मुंबईतील मतदान घोळाची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना आदेश
Telly Masala :  रितेश देशमुख करणार 'बिग बॉस मराठी'चे होस्टिंग ते 'पंचायत' फेम 'बिनोद'च्या चित्रपटानं कान्स फेस्टिवल गाजवलं; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
रितेश देशमुख करणार 'बिग बॉस मराठी'चे होस्टिंग ते 'पंचायत' फेम 'बिनोद'च्या चित्रपटानं कान्स फेस्टिवल गाजवलं; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
HSC Result 2024: बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर; मार्कशीट कशी डाऊनलोड कराल?
बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर; मार्कशीट कशी डाऊनलोड कराल?
HSC Result 2024: बारावीचा ऑनलाईन निकाल बघायला विद्यार्थी-पालकांच्या उड्या, पहिल्या 5 मिनिटांतच वेबसाईट क्रॅश, सर्व्हर डाऊन
बारावीचा ऑनलाईन निकाल बघायला विद्यार्थी-पालकांच्या उड्या, पहिल्या 5 मिनिटांतच वेबसाईट क्रॅश, सर्व्हर डाऊन
Pune Car Accident: पुण्यातील धनिकपुत्राने 'त्या' रात्री मद्यप्राशन केलं, 48 हजारांचं बिल भरलं, आमच्याकडे टेक्निकल पुरावा: पोलीस आयुक्त
पुण्यातील धनिकपुत्राने 'त्या' रात्री मद्यप्राशन केलं, 48 हजारांचं बिल भरलं, आमच्याकडे टेक्निकल पुरावा: पोलीस आयुक्त
Embed widget