Entertainment News Live Updates 23 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
भाजपच्या कार्यक्रमात राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून टायगर श्रॉफचा सत्कार; सचिन अहिर यांचा आरोप, तर शेलार म्हणतात...
'मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव' हा कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम वरळीमधील जांबोरी मैदान येथे पार पडला. भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांचा अपमान भाजपनं केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केला आहे. सचिन अहिर यांनी ट्वीट करुन हा आरोप केला आहे. राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून अभिनेता टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) सत्कार करण्यात आला, असंही सचिन अहिर यांचं मत आहे.
वैशाली ठक्कर प्रकरणात एक्स-बॉयफ्रेंड राहुल नवलानी पोलिसांच्या ताब्यात, आरोपी पूजाचा शोध सुरु
टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करच्या (Vaishali Thakkar) आत्महत्येप्रकरणी (Vaishali Thakkar Suicide Case) इंदूर पोलिसांनी मुख्य आरोपी असणाऱ्या राहुल नवलानी (Rahul Navlani) याला अटक केली आहे. आरोपी राहुल नवलानी याला पोलिसांनी इंदूरमधून अटक केली आहे. वैशालीने आत्महत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. वैशालीने आपल्या सुसाईड नोटमध्ये राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा नवलानी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून पोलीस राहुल आणि त्याच्या पत्नीच्या शोधात होते. मात्र, अद्याप राहुलची पत्नी पूजा फरार आहे.
Elnaaz Norouzi : सेक्रेड गेम्स फेम एलनाज नौरोजीकडून अनोख्या पद्धतीने हिजाब चळवळीचं समर्थन
Elnaaz Norouzi : इराणमधील (Iran) हिजाब विरोधी चळवळ दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. विविध सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांकडून इराणमधील हिजाब चळवळीचं समर्थन केलं जात आहे. सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील अभिनेत्री एलनाज नौरोजीने (Elnaaz Norouzi) देखील अनोख्या पद्धतीने या चळवळीचे समर्थन केले असून हिजाबच्या वादात इराणमध्ये मारल्या गेलेल्या महशा अमिनीच्या मृत्यूचा अनोख्या पद्धतीने निषेध केला असून एक खास संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. एलनाज नौरोजी आज जर्मनीहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. त्यावेळी तिने समोरच्या बाजूला 'वुमन-लाइफ-फ्रीडम' आणि 'फ्री-इराण' असे लिहिलेला टी-शर्ट घातला होता
Surya Movie: 'सूर्या' चा फर्स्ट लुक रिलीज; चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Surya Movie: मराठमोळा 'सूर्या' अखेरच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. 'सूर्या' या आगामी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन पिक्चर्सचा 'सूर्या' हा अॅक्शनपॅक्ड चित्रपट 2023 या नव्या वर्षातील पहिल्या आठवड्यात 6 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
Autograph Teaser: ‘ऑटोग्राफ’ चित्रपटाचा टीझर रिलीज; अंकुश चौधरी, अमृता खानविलकर अन् उर्मिला कोठारे प्रमुख भूमिकेत
Autograph Teaser: एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या बहुप्रतीक्षित ‘ऑटोग्राफ’चा (Autograph) टीजर प्रदर्शित झाला आहे. प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सतीश राजवाडे (Satish Rajwade) यांची ही सांगीतिक प्रेमकथा 30 डिसेंबर 2022 रोजी राज्यभरात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाली आहे. शनिवारी प्रदर्शित झालेल्या टीझरच्या माध्यमातून या चित्रपटातील महत्त्वाच्या काही प्रसंगांबरोबरच प्रतिभावान अभिनेत्यांचा सहभाग समोर येतो आणि रसिकांच्या या चित्रपटाकडून असेलेल्या अपेक्षा आणखी वाढतात.
पाहा टीझर
Chetan Kumar Ahimsa: अभिनेता चेतनविरोधात एफआयआर दाखल; भूत कोला परंपरेवर केलं होतं वक्तव्य
Chetan Kumar Ahimsa: सध्या 'कांतारा' (Kantara) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं बॉक्स कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटामधील एका सीनबद्दल वक्तव्य केल्यानं आता नुकताच अभिनेता चेतन कुमार अहिंसा (Chetan Kumar Ahimsa) हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चेतनवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Karnataka Police has registered an FIR against Kannada actor Chetan for allegedly hurting religious sentiments on the basis of a complaint against him alleging that he made "derogatory"statements while commenting on tradition of ‘Bhoota Kola' depicted in Kannada movie 'Kantara'
— ANI (@ANI) October 23, 2022
Sunny Movie: 'घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येकासाठी'; सनी चित्रपटातील 'रात ही' गाणं रिलीज
Sunny Movie: घरापासून लांब गेलेल्या ललित प्रभाकराला म्हणजेच 'सनी'ला क्षणोक्षणी घरच्यांची, त्याच्या मित्रांची आठवण येत आहे. ज्या गोष्टी घरी असताना त्याला क्षुल्लक वाटत होत्या, त्याचे महत्व त्याला घरापासून लांब गेल्यावर उलगडत आहे. 'होमसिक' बनलेल्या 'सनी'चा एक भावनिक प्रवास यात दिसत आहे.
Abhishek Bachchan: 'बेरोजगार' म्हणणाऱ्या ट्रोलरला अभिषेकनं दिलं सडेतोड उत्तर; ट्वीटनं वेधलं लक्ष
Abhishek Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. तो सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. अनेक वेळा काही नेटकरी अभिषेकला सोशल मीडियावर ट्रोल करतात. या ट्रोलर्सला अभिषेक सडेतोड उत्तर देतो. नुकतेच एक ट्वीट शेअर करुन एका युझरनं अभिषेकला ट्रोल केलं. या ट्वीटला अभिषेकनं रिप्लाय दिला आहे.