एक्स्प्लोर

Athiya Shetty KL Rahul Wedding : अथिया अन् केएल राहुलच्या प्री वेडिंग फंक्शनला आजपासून सुरुवात; जाणून घ्या मेहेंदी, संगीत, लग्नापासून ते वऱ्हाड्यांपर्यंत सर्वकाही...

Athiya - KL Rahul : अथिया शेट्टी आणि केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार असून आजपासून त्यांच्या प्री वेडिंग फंक्शनला सुरुवात होणार आहे.

Athiya Shetty KL Rahul Wedding : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुलचा (KL Rahul) बहुचर्चित लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वासह क्रिकेटविश्वात या लग्नसोहळ्याची चर्चा सुरु आहे. अखेर आजपासून अथिया आणि राहुलच्या प्री वेडिंग फंक्शनला सुरुवात होणार आहे. 

अथिया शेट्टी आणि केएल राहुलचा शाही विवाहसोहळा (Athiya Shetty KL Rahul Wedding) सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांच्या खंडाळा येथील बंगल्यात पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर येत्या 23 जानेवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. 

अथिया आणि केएल राहुल फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत अडकणार लग्नबंधनात

मीडिया रिपोर्टनुसार, सुनील शेट्टी त्यांच्या लाडक्या लेकीचं थाटामाटात लग्न लावणार आहेत. पण या लग्नसोहळ्याची खासियत म्हणजे केएल राहुल आणि अथिया शेट्टी फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकणार आहेत. तसेच लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट न करण्याचे आदेश पाहुण्यांना देण्यात आले आहेत. कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. 

अथिया आणि केएल राहुलच्या लग्नसोहळ्याला मोजके पाहुणे उपस्थित असणार असल्याने लग्नानंतर काही आठवड्यांनी एका खास रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेट विश्वातील मंडळींसाठी खास या खास रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं आहे. 

अथिया आणि केएल राहुलचा लग्नसोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला असला तरी दोघांनीही अद्याप लग्नासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. अथिया आणि केएल राहुलचं घर तसेच सुनील शेट्टींच्या खंडाळा येथील बंगल्यावर खास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

अथिया-केएल राहुलच्या लग्नसोहळ्यात सेलिब्रिटींची हजेरी

अथिया आणि केएल राहुलच्या लग्नसोहळ्यात सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shahrukh Khan), विराट कोहली (Virat Kohli), अर्जुन कपूर (Arjun Kapoor)  हे सेलिब्रिटी उपस्थित राहू शकतात. आज आणि उद्या हळद, मेहेंदी आणि संगीताचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर 23 जानेवारीला अथिया आणि केएल राहुल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 

अथिया आणि केएल राहुल पहिल्यांदा एका पार्टीत भेटले होते. त्यानंतर त्यांच्यात छान मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर आता अथिया आणि केएल राहुल नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. 

संबंधित बातम्या

KL Rahul Wedding: आथिया-राहुलच्या लग्नाला कोण कोण येणार? सलमान-शाहरुख अन् विराटच्या नावाची चर्चा

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget