एक्स्प्लोर

KL Rahul Wedding: आथिया-राहुलच्या लग्नाला कोण कोण येणार? सलमान-शाहरुख अन् विराटच्या नावाची चर्चा

KL Rahul Athiya Shetty Wedding : 23 जानेवारी रोजी हे लव्हबर्ड विवाह बंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टीनं याआधीच मुलीच्या लग्नाला मोजक्याच लोकांची उपस्थिती असेल, हे स्पष्ट केलेय.

KL Rahul Athiya Shetty Wedding : स्टार क्रिकेटर केएल राहुल  (Rahul Shetty) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. तीन दिवसांचा शाही विवाहसोहळा खंडाळ्यात पार पडणार आहे. तीन दिवसानंतर म्हणजेच 23 जानेवारी रोजी हे लव्हबर्ड विवाह बंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टीनं याआधीच मुलीच्या लग्नाला मोजक्याच लोकांची उपस्थिती असेल, हे स्पष्ट केलेय. लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. केएल राहुल आणि आथियाचं घर रोषणाईनं सजलं आहे. 

सुनील शेट्टी यानं लग्नाला मोजकेच लोक उपस्थित असतील असं स्पष्ट केलेय. लग्नाला कोण कोण येणार याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, राहुल-आथियाच्या लग्नाला शाहरुख खान, सलमान खान, विराट कोहली यासारखे दिग्गज येणार आहेत. सुनील शेट्टी आणि माना आपल्या मुलीचं लग्न शाही करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. ते तयारीला लागले आहेत. खंडाळ्यातील जश्न बंगल्यासमोर असलेल्या मैदानात आथिया आणि राहुल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 21 तारखेपासून लग्नातील विविध विधी सुरु होणार आहेत. आथिया आणि राहुल यांना सिंपल लग्न करायचं होतं, असे सुनील शेट्टीने सांगितलेय. 

सलमान-शाहरूख लग्नाला राहू शकतात उपस्थित - 
आथिया आणि राहुल या लव्हबर्डच्या लग्नाला कोण कोण येणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेय. अद्याप याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण सलमान खान, शाहरुख खान, विराट कोहली, अर्जुन कपूर लग्नाला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. सुनील शेट्टीचे जवळच्या लोकांचं खंडाळ्याला येणं-जाणं सुरु झालं आहे. 21 जानेवारीपासून लग्नाच्या विधीला सुरुवात होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या शाही विवाहात संगीत, हळदी, लेडीज नाइट.. होणार आहे. सुनील शेट्टीने लग्नाला येणाऱ्यांसाठी शानदार सोय केली आहे.  अथिया आणि केएल राहुलच्या हळद, मेहेंदी आणि संगीत सोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 21 आणि 22 जानेवारीला हळद, मेहेंदी आणि संगीताचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर 23 जानेवारीला अथिया आणि केएल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 

अथियाने 2015 मध्ये अॅक्शन 'हिरो' या चित्रपटामधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये आथियाने महत्वाची भूमिका साकारली आहे. केएल राहुल भारतीय संघाचा उप कर्णधार आहे. तो भारतीय संघाचा नियमीत सदस्य आहे. तर आयपीएलमध्ये लखनौ संघाचा कर्णधार आहे. 
 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss : 'माझी लायकी काढायची नाही..', बिग बॉसच्या घरात अनुश्री अन् तन्वीमध्ये राडा, PROMO सोशल मीडियात व्हायरल 
'माझी लायकी काढायची नाही..', बिग बॉसच्या घरात अनुश्री अन् तन्वीमध्ये राडा, PROMO सोशल मीडियात व्हायरल 
गौरव कपूर अडकणार 'या' अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात; वेडिंग कार्डची चर्चा, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी...
गौरव कपूर अडकणार 'या' अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात; वेडिंग कार्डची चर्चा, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी...
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं बंद; नव्या अकाउंटमधून चाहत्यांना दिली माहिती, म्हणाला...
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं बंद; नव्या अकाउंटमधून चाहत्यांना दिली माहिती, म्हणाला...
Shreya Ghoshal: 'कधी पैसे दिले जात नव्हते, तर कधी क्रेडिट...'; श्रेया घोषालकडून म्युझिक इंडस्ट्रीची पोलखोल, खुलासा करत म्हणाली...
'कधी पैसे दिले जात नव्हते, तर कधी क्रेडिट...'; श्रेया घोषालकडून म्युझिक इंडस्ट्रीची पोलखोल, खुलासा करत म्हणाली...

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget