(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मिथून चक्रवर्तींच्या प्रसिद्ध गाण्यावर थिरकली परिणीती चोप्रा, पाहा VIDEO
डान्स शोमध्ये सहभागी स्पर्धांकसह परिक्षकही मजा-मस्ती करताना दिसत असतात.
Parineeti Chopra dance with Mithun Chakraborty: छोट्या पडद्यावर अर्थात टेलीव्हीजनवर अनेक रिएलीटी शो सुरु असतात. यांचा चाहतावर्गही भरपूर आहे. असाच एक नवा रिएलीटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोचं नाव आहे हुनरबाज (Hunarbaaz). या शोमध्ये विविध स्पर्धक आपली कला सादर करणार असून त्यांना देशाच्या जनतेपर्यंत या शोच्या माध्यमातून पोहोचवलं जाणार आहे. या शोमध्ये मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty), परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि करण जोहर (Karan Johar) हे तिघे असून हे सर्व मजा-मस्ती करत हा शो जणू होस्टच करणार आहेत.
कलर्स टीव्हीवर येणाऱ्या या शोचे सध्या प्रोमोस सुरु असून यामध्ये धमाल, मजा-मस्ती दाखवली जात आहे. असाच एक मजा-मस्ती करतानाचा व्हीडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्या प्रसिद्ध जिमी-जिमी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या गाण्याचा व्हिडीओ कलर्स टीव्हीने सोशल मीडियावर शेअर देखील केला असून चाहत्यांची या व्हीडीओला तुफान पसंती मिळत आहे.
22 जानेवारीला सुरु होणार शो
तर हा धमाल शोचा प्रोमो इतका हीट होत असताना या शोची वाट अनेकजण पाहत आहेत. दरम्यान हा धमाकेदार हुनरबाज़ (Hunarbaaz) शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून परिणीती, करण आणि मिथून चक्रवर्ती नुसती धमाल उडवणार याच शंका नाही. तर हा शो 22 जानेवारीपासून दररोज रात्री 9 ला टेलीकास्ट होणार आहे
हे ही वाचा-
- Mouni Roy Bachelor Party : मौनी रॉयची गोव्यात गुप्त बॅचलर पार्टी, मैत्रिणीने शेअर केले खास फोटो
- सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनसोबत ओळख करून घेण्यासाठी पिंकीला पैसे दिले : ईडी
- Movies Release in 2022: ‘लाल सिंह चड्ढा' ते 'आरआरआर'; 2022 मध्ये 'हे' चित्रपट करणार प्रेक्षकांचे मनोरंजन
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live