Akhilesh Yadav: यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
एकट्या अखिलेश यादव यांनी महाआघाडीच्या उमेदवारांसाठी 20 हून अधिक सभा घेतल्या आहेत आणि आज आणखी चार सभा घेणार आहेत, जरी येथे सपाचा एकही उमेदवार उपस्थित नसला तरी.

Akhilesh Yadav: राष्ट्रीय जनता दल (राजद) नेते आणि महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी आज (9 नोव्हेंबर) त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या समर्थकांसह अनेक नेते त्यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, सपा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी शुभेच्छा देताच बिहारसह देशामध्ये भूवया उंचावल्या. बिहारचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी, अशी मनोकामना व्यक्त करत त्यांनी तेजस्वी यादवांना हटके शुभेच्छा दिल्या. अखिलेश यादव यांनी आज सकाळी त्यांच्या सोशल मीडिया हँडल, एक्स वर पोस्ट करून तेजस्वी यादव यांना शुभेच्छा दिल्या. या पोस्टद्वारे अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आणि महाआघाडी एकजूट असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.
बिहार के जनप्रिय ‘नौकरी-नायक’ युवा नेता श्री तेजस्वी यादव जी को जन्मदिन की हार्दिक बधाई और बिहार के आगामी मुख्यमंत्री के रूप में शपथ लेने की अनंत शुभकामनाएं! pic.twitter.com/xkWRoICpuo
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) November 9, 2025
अखिलेश यादव यांनी काय लिहिले?
सपा राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एक्स वर पोस्ट करून लिहिले, "बिहारचे लोकप्रिय 'नोकरी नायक' तरुण नेते तेजस्वी यादव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बिहारचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी शुभेच्छा!" इतर नेतेही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत, परंतु मुख्यमंत्रीपदाची शपथ असा उल्लेख कोणीही केलेला नाही. संपूर्ण बिहारमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाचे अनेक नेते बिहारमध्ये प्रचार करत आहेत. एकट्या अखिलेश यादव यांनी महाआघाडीच्या उमेदवारांसाठी 20 हून अधिक सभा घेतल्या आहेत आणि आज आणखी चार सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे बिहारमध्ये एकही सपाचा उमेदवार नाही. तरीही झंझावाती प्रचार अखिलेश यादव यांच्याकडून केला जात आहे. त्यांच्या प्रत्येक सभेत अखिलेश यादव लोकांना तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत ते म्हणतात की तेजस्वी मुख्यमंत्री झाल्यामुळे बिहारमधील तरुणांना नोकऱ्या मिळतील.
विरोधी एकतेचा संदेश
अखिलेश यादव यांनी ज्या पद्धतीने महाआघाडीच्या उमेदवारांसाठी रॅलींमध्ये प्रचार केला आणि आज तेजस्वी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ते पाहत तेजस्वी यांच्या नेतृत्वाबाबत विरोधी पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचे द्योतक असल्याचे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























