Maharashtra Crime: मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
Maharashtra Crime: बीडच्या माजलगावातील केसापुरीजवळ भीषण अपघात समोरासमोर धडक झाल्यानं एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सादोळ्याकडे जाणाऱ्या ऑटो रिक्षाला समोरून आलेल्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली.

मुंबईमध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावर मालाडजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच चिरडून ठार झाला. आज (9 नोव्हेंबर) मध्यरात्री 1:30 च्या सुमारास भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरखाली बाईक गेल्यामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी जागेवरच मृत्यू तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. बोरिवलीकडून अंधेरीच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर मालाडजवळ हा अपघात झाला.
नेमका अपघात कसा घडला?
भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरला मागून बाईक चालक मागून चाकाखाली गेला. यावेळी डंपरने बाईक चालकाला चिरडल्यामुळे जागेवरच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॉडी ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयामध्ये पाठवली. कुरार पोलिसांनी ADR दाखल करून यामध्ये चूक कोणाची आहे, कशामुळे ह अपघात झाला या संदर्भात अधिक तपास करत आहेत.
ऑटो रिक्षा चालकास स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
दुसरीकडे, बीडच्या माजलगावातील केसापुरीजवळ भीषण अपघात समोरासमोर धडक झाल्यानं एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सादोळ्याकडे जाणाऱ्या ऑटो रिक्षाला समोरून आलेल्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. धडकेनंतर स्कॉर्पिओने ऑटो रिक्षा चालकाला तब्बल दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या भीषण घटनेत शेख अमीर इलाही या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. एक जण या घटनेत गंभीर जखमी असून त्याला प्राथमिक उपचारानंतर संभाजीनगर येथे हलवण्यात आलं आहे. अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास माजलगाव पोलीस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
























