एक्स्प्लोर

Rohit Pawar: पार्थचा थेट उल्लेख टाळला, अजित दादांचा गट म्हणत रोहित पवारांचा हल्लाबोल! म्हणाले, 'गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन' सरकारची नवी योजना

Rohit Pawar: महाराष्ट्रात जे सर्व काही घोळ सुरू आहेत त्यासाठी सरकारचे प्रमुख म्हणून प्रामुख्याने मुख्यमंत्री जबाबदार असून आणि त्यांनी या सर्व घोळांची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

Rohit Pawar on Ajit Pawar: सत्ताधारी नेत्यांचे नातेवाईक असोत, विरोधी नेत्यांचे नातेवाईक असोत, व्यावसायिक असोत, किंवा सरकारशी संबंध नसलेले नागरिक असो, नियम सर्वांसाठी लागू असून कारवाई झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. अशा प्रकरणांची शहानिशा झाली पाहिजे आणि काय खरे आणि काय खोटे आहे, हे लोकांसमोर आले पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. कुठलाही नेता किंवा त्यांच्या परिवारातील सदस्य असो, जर चूक केली असेल, तर ती चूकच समजून योग्य कारवाई व्हायला हवी. मात्र, ही कारवाई करताना कुठेही भेदभाव होता कामा नये.

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून जमीन घोटाळे

रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्वात मोठे जमिनी घोटाळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून झाले आहेत. या भ्रष्टाचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे जबाबदार आहेत, तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारमधील प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे. त्यांनी या सरकारचे ब्रीदवाक्य "करून बोट चोरी करू करूया जमिनीची लूटमारी" असे झाले आहे आणि हे सरकार "गुन्हेगारांना जमीन आणि नेत्यांना जमीन" या विषयावर आलेले आहे, असा आरोप केला. रोहित पवार यांनी केवळ व्यक्तींवर नव्हे, तर गैरव्यवहार घडवणाऱ्या यंत्रणेच्या 'साखळी'वर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली आहे. पाठिंबा देणारे अधिकारी कोण आहेत, ते कसे वागतात, काही लोकांनाच महत्त्व का देतात आणि गरिबांची कामे का होत नाहीत, याची शहानिशा करणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. 

दरम्यान, रोहित पवार यांनी ट्विट करत “गुन्हेगारांना जामीन - नेत्यांना जमीन”  सरकारची नवी योजना सुरु असल्याचा हल्लाबोल केला आहे. त्यांनी महायुती सरकारमधील जमीन घोटाळ्यांचा उल्लेख केला आहे. यामध्ये त्यांनी भाजप कार्यालयावरूनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.  

“गुन्हेगारांना जामीन - नेत्यांना जमीन”  सरकारची नवी योजना 

  • नवी मुंबईत शिंदे साहेबांचा गट 5000 कोटीची सिडको जमीन 
  • पुण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा – 1800 कोटीची जैन बोर्डिंग जमीन 
  • पुण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा- 500  कोटीची मोबोज हॉटेल कंपाऊंड इव्याकु प्रॉपर्टी ची जमीन
  • संभाजीनगरमध्ये शिंदे साहेबांचा गट – #MIDC ची राखीव जमीन 
  • संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भाजपा – 200 कोटीची अंजली टॉकीजची जमीन 
  • पुण्यात अजित दादांचा गट –300 कोटीची कोरेगाव पार्क जमीन
  • अहिल्यानगरमध्ये अजित दादांचा गट – जैन समाजाची जमीन 
  • नवी मुंबई विमानतळाजवळ अवैध गौण खनिज उत्खनन घोटाळा - 3000 कोटी
  • मुंबईत देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा – SRA च्या हजारो कोटींच्या जमिनी 
  • नाशिकमध्ये शिंदे साहेबांचा गट -  त्र्यंबकेश्वर जमीन 
  • मुंबईदेवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा – भाजपा कार्यालयाची जमीन 

करून वोटचोरी- करू जमिनीची लुटमारी

हे सर्व घोटाळे बघता शिवसेना शिंदे गट , भाजप, राष्ट्रवादी अजितदादा गट या तिन्ही सत्ताधारी पक्षांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कायदे -नियमांना धाब्यावर बसवून जमिनी लाटणारी  “गुन्हेगारांना जामीन - नेत्यांना जमीन” अशी नवी योजना सरकारमार्फत सुरू केलीय असेच म्हणावे लागेल. “करून वोटचोरी- करू जमिनीची लुटमारी” असे नवे ब्रीदवाक्य सरकारने ठेवायला हरकत नाही.

‘आपला तो बाबू आणि दुसऱ्याचे ते कारटं’

भाजपशी संबंधित प्रकरणे आली की चौकशी आधीच क्लीन-चीट द्यायची आणि इतर दोन मित्रपक्षांची प्रकरणे असली की पॉलिटिकल स्कोर सेटल होईपर्यंत आणि पॉलिटिकल बार्गेनिंग होईपर्यंत चौकशीचा बनाव करायचा अशा प्रकाराची ‘आपला तो बाबू आणि दुसऱ्याचे ते कार्ट’ ही भाजपची कार्यपद्धती दिसून येते. परिणामी महाराष्ट्रात हे जे सर्व काही घोळ सुरू आहेत त्यासाठी सरकारचे प्रमुख म्हणून प्रामुख्याने मुख्यमंत्री जबाबदार असून आणि त्यांनी या सर्व घोळांची जबाबदारी घ्यावी. असो, मुख्यमंत्री या सर्वच प्रकरणांची कुठलाही भेदभाव न करता पारदर्शकपणे चौकशी करतील का? हे बघणं महत्वाचं ठरेल!

इतर महत्वाच्या बातम्या

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget