Ashok Selvan and Keerthi Pandian: अभिनेता अशोक सेल्वन आणि कीर्ती पांडियन यांचा विवाह सोहळा संपन्न; लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल
Ashok Selvan and Keerthi Pandian: अशोक आणि कीर्ती यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Ashok Selvan and Keerthi Pandian: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अशोक सेल्वन (Ashok Selvan) आणि अरुण पांडियन यांची मुलगी अभिनेत्री कीर्ती पांडियन (Keerthi Pandian) यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे. अशोक आणि कीर्ती गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. अशोक आणि कीर्ती यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अशोक सेल्वन आणि कीर्ती पांडियन यांची एंगेजमेंट काही महिन्यांपूर्वी झाली होती. आता त्यांचा लग्न सोहळा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. तिरुनेलवेली येथे अशोक सेल्वन आणि कीर्ती पांडियन यांचा विवाह सोहळा पार पडला.
कीर्ती आणि अशोक यांनी त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी या फोटोला कॅप्शन दिलं. 'आमचे हृदय प्रेमामध्ये मिसळले आहे' कीर्ती आणि अशोक यांनी त्यांच्या विवाह सोहळ्यासाठी खास लूक केला होता. दोघांनी ऑफ व्हाईट कलरचे आऊटफिट परिधान केले होते. कीर्तीनं विवाह सोहळ्यासाठी ऑफ व्हाईट साडी आणि गोल्डन ज्वेलरी असा लूक केला होता.
View this post on Instagram
अशोक सेल्वन आणि कीर्ती पांडियन यांचे रिसेप्शन चेन्नई येथे होणार आहे. सोशल मीडियावर नेटकरी अशोक आणि कीर्ती यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. कीर्तीची चुलत बहीण असणारी अभिनेत्री रम्या पांडियन तिने कीर्ती आणि अशोक यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
कीर्ती आणि अशोक यांचे चित्रपट
अशोक सेल्वननं सूथु कव्वम या चित्रपटाद्वारे तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.पिझ्झा 2, थेगिडी, सावळे समळी, मन्मथा लीला या चित्रपटामध्ये त्यानं काम केलं.अशोकनं तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अशोकने निनिला निनिला या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला. तसेच कीर्ती पांडियनने थुंबा आणि अनबिरकिनियल सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.