![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO: आशा भोसलेंच्या नातीची सोशल मीडियावर चर्चा; बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देणारं सौंदर्य पाहून नेटकरी म्हणतात...
आशा भोसले (Asha Bhosle) यांची नात जनाई भोसले (Zanai Bhosle) हिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
![VIDEO: आशा भोसलेंच्या नातीची सोशल मीडियावर चर्चा; बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देणारं सौंदर्य पाहून नेटकरी म्हणतात... asha bhosle granddaughter zanai bhosle photo and video viral on social media netizens say she looks mixture of kajol aishwarya VIDEO: आशा भोसलेंच्या नातीची सोशल मीडियावर चर्चा; बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देणारं सौंदर्य पाहून नेटकरी म्हणतात...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/5796b46a4ebda8621cf7feea1acdc8a41704370896632259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Asha Bhosle: प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी अनेक हिट चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. अशा भोसले यांना 'मेलोडी क्वीन' असंही म्हटलं जातं. आशा भोसले या त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकतात. त्या अनेक कार्यक्रमांना देखील हजेरी लावतात. नुकत्याच आशा भोसले या त्यांच्या नातीसोबत एका कार्यक्रमामध्ये स्पॉट झाल्या. यावेळी अनेक पापाराझींनी त्यांचे फोटो काढले. आशा भोसले यांच्यासोबत त्यांची नात जनाई भोसले (Zanai Bhosle) हिचे देखील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जनाईच्या सौंदर्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
जनाईच्या खास लूकनं वेधलं लक्ष
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये जनाई ही मोकळे केस, साडी आणि मोत्यांचे गळ्यातले अशा लूकमध्ये दिसत आहे. तर आशा भोसले या ऑफ व्हाइट कलरची साडी आणि मोत्यांची ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहेत. जनाई आणि आशा भोसले यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करुन जनाईच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
जनाईच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "ती काजोल आणि ऐश्वर्यासारखी दिसते." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "तिचे डोळे ऐश्वर्यासारखे आहेत तर नाक आणि आयब्रे हे काजोल सारखे आहेत."
View this post on Instagram
जाणून घ्या जनाईबद्दल
जनाई ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांची मुलगी आहे. जनाई ही तिच्या आजीप्रमाणेच गायिका आहे.ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. जनाईनं आशा भोसले यांच्यासोबत गाणं गात असतानाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये ती आशा भोसले यांच्यासोबत 'तू है वही' हे गाणं गाताना दिसत आहे. जनाई ही इन्स्टाग्रामवर अॅक्टीव असते. तिला इन्स्टाग्रामवर 60.8K फॉलोवर्स आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
In Pics: आशा भोसलेंची नात पाहिलीत का? भल्या भल्या अभिनेत्रीही फिक्क्या पडतील
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)