एक्स्प्लोर

Aryan Khan Case : ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लिन चीट देणाऱ्या NCB अधिकाऱ्याची स्वेच्छानिवृत्ती ; काय आहे कारण?

Aryan Khan Drugs Case : कॉर्डेलिया क्रूझ वरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लिन चिट देणारे एनसीबीचे अधिकारी संजय सिंह यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली.

Aryan Khan Drugs Case :  बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) हा ड्रग्ज प्रकरणात अडकल्याने मोठा गदारोळ झाला होता. आर्यन खान हा ड्रग्ज प्रकरणात 25 दिवस तुरुंगात होता. या प्रकरणामुळे फक्त बॉलिवूडच नव्हे तर राजकारणही ढवळून निघाले होते.आर्यन खानला अटक करणारे तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडेदेखील चर्चेत आले होते. आता याच क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लिन चीट देणारे एनसीबीचे अधिकारी संजय सिंह यांनी सेवेतून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. एका बाजूला समीर वानखेडेंची चौकशी सुरू असताना आता दुसरीकडे संजय सिंह यांनीदेखील व्हीआरएस घेतल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. 

2021 मध्ये  कॉर्डेलिया क्रूझवर समीर वानखेडे यांनी छापेमारी करत आर्यन खानसह इतरांना अमली पदार्थ बाळगणे, सेवन करण्याच्या आरोपात अटक केली होती.  या  कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर  कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणी तपासासाठी एनसीबीने एक विशेष चौकशी पथक स्थापन केले होते. या एसआयटीचे नेतृत्व संजय सिंह यांनी केले होते. एसआयटीने आर्यन खानला क्लिन चिट दिली होती.  

संजय सिंह यांनी का घेतली स्वेच्छानिवृत्ती?

आयपीएस अधिकारी असलेल्या संजय सिंह यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने चर्चांना उधाण आले. 1996 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले संजय सिंह हे सध्या एनसीबी मुंबई उपमहासंचालक पदावर कार्यरत होते. त्यांनी 29 फेब्रुवारी रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. सरकारने हा अर्ज 16 एप्रिल रोजी मंजूर केला. संजय सिंह यांनी काही वैयक्तिक कारणांसाठी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. 

जानेवारी 2021 मध्ये NCB मध्ये सामील होण्यापूर्वी, सिंग यांनी ओडिशा पोलिसांच्या ड्रग-टास्क फोर्सचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून काम केले आणि राज्यातील अंमली पदार्थांच्या तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी अनेक पावले उचलली.

आर्यन खान प्रकरणाच्या तपासादरम्यान, सिंह यांनी त्यांच्या टीमच्या तपासावर देखरेख करण्यासाठी मुंबईला अनेक भेटी दिल्या आणि सर्व साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या. त्यानंतर एनसीबीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आर्यनवर आरोप लावण्याची गरज असल्याचा निष्कर्ष काढला. सिंग यांच्या तपासाला एनसीबीचे महासंचालक एसएन प्रधान यांचा पूर्ण पाठिंबा होता. तपासानंतर केंद्र सरकारने एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करण्याची आणि आर्यन खानसह सहा जणांवरील अंमली पदार्थांचे आरोप वगळण्याची शिफारस केली होती.

सीबीआयमध्ये असताना हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास

संजय सिंह यांनी  2008 आणि 2015 च्या दरम्यान सीबीआयमध्ये कार्यरत असताना हाय-प्रोफाइल प्रकरणांच्या तपासाची जबाबदारी पार पाडली होती. यामध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराचे प्रकरण, 2010 मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भ्रष्टाचार प्रकरणांचाही समावेश आहे. त्याशिवाय, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियातील अनियमितता, सीआरपीएफ भरती घोटाळासह इतर अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास केला. 

काय आहे आर्यन खान प्रकरण?

एनसीबीने 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीने या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह जवळपास 20 जणांना अटक करण्यात आली होती. जवळपास 25 दिवसांच्या कारावासानंतर आर्यन खानला जामीन मिळाला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 26 March 2025Special Report | Santosh Deshmukh | मास्टरमाईंड हत्येचा वाल्मिक कराडच! खटला ट्रॅकवर, न्याय लवकर?Special Report|Opposition Leader | संपला कालावधी निवड कधी? विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्तच राहणार?Special Report | Kunal Kamra | गाण्यावरुन वादंग, कामरावर हक्कभंग; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी सभागृहात गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
Embed widget