Arun Govil Property : लाखो रुपयांची गाडी, मुंबईत आलिशान घर, कोट्यावधी रुपयांची मालमत्ता; छोट्या पडद्यावरील 'रामा'ची संपत्ती किती?
Arun Govil Property : लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल देखील उतरले आहेत. दरम्यान प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे.
Arun Govil Property : लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीत सध्या प्रत्येक पक्षाकडून जय्यत तयारी सुरु आहे. अद्यापही अनेक लोकसभा मतदारसंघाचा तिढा काही केला सुटत नसल्याचं चित्र आहे, तर काही लोकसभा मतदारसंघात पक्षाकडून दिग्गजांची वर्णी लावण्यात आली आहे. यामध्ये कलाकार मंडळीही मागे राहिली नाहीत. भाजपकडून (BJP) हिमाचल प्रदेशातून (Himachal Pradesh) कंगना रणौतला (Kangana Ranaut) तर उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठ मतदारसंघातील रामायणातील रामाला म्हणजेच अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये.
सध्या अरुण गोविल हे त्यांच्या मतदारसंघात प्रचारात व्यस्त आहेत. अरुण गोविल यांना त्यांच्या जन्मभूमीतूनच भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीत नुकतच त्यांनी त्यांचं प्रतिज्ञापत्रही सादर केलं आहे. त्यामध्ये त्यांच्या संपत्तीचा देखील खुलासा करण्यात आलाय. त्यामुळे सध्या त्यांच्या उमेदवारीसोबतच त्यांच्या संपत्तीची देखील सर्वत्र चर्चा आहे. अरुण गोविल यांच्या संपत्तीविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
अरुण गोविल यांची सपत्ती किती?
अरुण गोविल यांच्याकडे 63 लाखांची मर्सिडीज कार असून त्यांची एकूण 3.19 कोटींची जंगम मालमत्ता आहे. तसेच त्यांची पत्नी श्रीलेखा यांच्याकडे 2.76 कोटींची संपत्ती आहे. अरुण गोविल यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात 5.67 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नीकडे 2.80 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
अरुण गोविल यांच्या रोख रक्कम किती?
अरुण गोविल यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात ते वर्सोव्याला राहत असल्याचं सांगितलं आहे. तसेच त्यांचे मतदान देखील तिथलेच आहे. त्यांच्याकडे 3.75 लाख रुपयांची रोख रक्कम आहे. त्यांच्या पत्नीकडे 4.07 लाख रुपयांची रोख रक्कम आहे. अरुण गोविल यांच्याकडे फक्त एक कार लोन आहे. प्रतिज्ञापत्रापासून, अरुण गोविल यांच्याकडे 14.65 लाख रुपयांचं कर्ज आहे.
अरुण गोविल यांच्या बँक खात्यात किती रुपये?
अरुण गोविल यांनी त्यांच्या बँकेच्या खात्याची देखील माहिती यावेळी दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, त्यांच्या बँकेच्या खात्यात 1.03 कोटी रुपये आहेत, त्याचप्रमाणे श्रीलेखा यांच्या खात्यात 80.43 कोटी रुपये आहेत. दरम्यान छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांची मनं जिंकणारे अरुण गोविल हे लोकसभेच्या रिंगणात जनतेची मनं जिंकणार का हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.