Anya : 'अन्य' सिनेमात प्रथमेश परब दिसणार वास्तववादी भूमिकेत
Anya : 'अन्य' हा सिनेमा 10 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Anya : 'अन्य' (Anya) हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा सिनेमा मराठीसह हिंदीतदेखील प्रदर्शित होणार आहे. 10 जूनला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रथमेश परब वास्तववादी भूमिकेत दिसणार आहे.
प्रथमेश परबने घेतली कठोर मेहनत
काही कलाकार सिनेमातील आपल्या पात्राला योग्य न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत किंवा रिस्क घ्यायला मागे पुढे पहात नाहीत. मराठीसोबतच हिंदीतही सक्रीय असणारा महाराष्ट्राचा लाडका प्रथमेश परबही याबाबतीत नेहमी आघाडीवर असतो. आपल्या वाट्याला आलेलं काम अत्यंत प्रामाणिकपणे करायचं आणि त्यासाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायची हा प्रथमेशला आजवर मिळालेल्या यशाचा मंत्र आहे. 10 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'अन्य' या हिंदी-मराठी चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठीही प्रथमेशनं अत्यंत कठोर मेहनत घेतली आहे.
प्रथमेशनं साकारलेला दगडू जसा महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाला तसंच 'अन्य'मधीलही त्याचं पात्र लोकप्रिय होणार आहे. केवळ त्यात प्रथमेश रोमँटिक मूडमध्ये होता, पण आता त्याचा रावडी लूक पहायला मिळणार आहे. वास्तववादी घटनांवर आधारलेल्या 'अन्य'मध्ये समाज विघातक रॅकेटचा पर्दाफाश करण्याची कामगिरी हाती घेण्यात येते. यासाठी हेरगिरी करण्याची जबाबदारी प्रथमेशकडे सोपवण्यात येते. सिनेमात हे पात्र खरं वाटावं यासाठी प्रथमेशनं चक्क दिल्लीतील रेड लाईट एरियात जाऊन पाहणी केली होती. कोणतीही भूमिका एकरूप होऊन केली की ती प्रेक्षकांपर्यंत अगदी सहजपणे पोहोचते असं प्रथमेश मानतो. याच कारणासाठी आपण ज्या प्रकारची व्यक्तिरेखा साकारतो त्याचं राहणीमान, त्याचा स्वभाव, त्याची बोलीभाषा आत्मसात करण्यासाठी प्रथमेश नेहमीच सज्ज असतो. 'अन्य'मधील कॅरेक्टरही लोकांपर्यंत अगदी सहजपणे पोहाचवता यावं यासाठीच रेड लाईट एरियाला भेट दिल्याचं प्रथमेशचं म्हणणं आहे. यात प्रथमेशची भूमिका अत्यंत वास्तववादी असून, कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणारी आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा
अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब, तेजश्री प्रधान, भूषण प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे हे मराठीतील आघाडीचे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. यांच्या जोडीला हिंदीसह बंगाली सिनेसृष्टीतही नावलौकीक मिळवलेली अभिनेत्री रायमा सेन, हिंदी सिनेसृष्टीतील यशपाल शर्मा आणि गोविंद नामदेव हे कलाकारही 'अन्य'मध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
संबंधित बातम्या