Anushka Virat On Natu Natu: विराट कोहली थिरकला 'नाटू-नाटू' गाण्यावर; व्हिडीओ व्हायरल
नुकतीच विरुष्कानं इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 मध्ये हजेरी लावली. यावेळी रेड कार्पेटवरील अनुष्का (Anushka Sharma) आणि विराटच्या (Virat Kohli) लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं.
Anushka Virat On Natu Natu: क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे Power Couple म्हणून ओळखले जातात. विराट आणि अनुष्का हे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करतात. नुकतीच विरुष्कानं इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 मध्ये हजेरी लावली. यावेळी रेड कार्पेटवरील अनुष्का आणि विराटच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं. या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर अनुष्का आणि विराटनं काही गेम्स देखील खेळल्या.
विराट थिरकला 'नाटू-नाटू' गाण्यावर
इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 सोहळ्यात क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. कार्यक्रमामध्ये एका होस्टनं अनुष्का आणि विराटसोबत काही गेम्स खेळल्या. या गेममध्ये अनुष्कानं तिच्या "3 AM फ्रेंड" बाबत सांगितलं. तुझा "3 AM फ्रेंड" कोण आहे? असा प्रश्न विचारल्यानंतर अनुष्कानं विराटचं नाव घेतलं. त्यानंतर त्या होस्टनं विराटला एका गाण्यावर डान्स करायला सांगितला. यावेळी विराटनं आरआरआर या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यावर डान्स केला. विराटच्या डान्सचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का ही विराटचे डान्सिंग स्किल्स पाहून स्माइल करताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
Virat Kohli doing Naatu Naatu steps. pic.twitter.com/iN2aMvSE5Q
— Johns. (@CricCrazyJohns) March 26, 2023
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
विराटनं नाटू-नाटू' गाण्यावर केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या. काही नेटकऱ्यांनी व्हिडीओला कमेंट करुन विराटच्या डान्सला ट्रोल केलं. तर काहींनी विराटच्या डान्सचं कौतुक केलं.
अनुष्काचे आगामी चित्रपट
2017 मध्ये अनुष्कानं विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये तिनं मुलगी वामिकाला जन्म दिला. गेली काही वर्ष अनुष्का शर्मानं चित्रपटातून ब्रेक घेतला होता. अनुष्काचे चाहते तिच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता अनुष्का ही बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार आहे.
अनुष्का शर्मा ही ‘चकदा एक्सप्रेस’ (Chakda 'Xpress) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुष्कानं या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. चकदा एक्सप्रेस या चित्रपटाचं कथानक हे झूलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अनुष्काच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: