Animal Teaser: रणबीर आणि रश्मिकाच्या 'अॅनिमल' चा टीझर झळकला टाइम्स स्क्वेअरवर; व्हिडीओ व्हायरल
Animal Teaser: अॅनिमल चित्रपटाचा टीझर न्यूयॉर्क (New York) येथील टाइम्स स्क्वायरवर (Times Square) झळकला आहे.
Animal Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या अॅनिमल (Animal) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता अॅनिमल चित्रपटाचा टीझर न्यूयॉर्क (New York) येथील टाइम्स स्क्वायरवर (Times Square) झळकला आहे. नुकताच चित्रपटाच्या मेकर्सनं टाइम्स स्क्वायर येथील एक व्हिडीओ शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.
अॅनिमल द फिल्म या ट्विटर अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये टाइम्स स्क्वायरवर अॅनिमल चित्रपटाचा टीझर दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं, "टीम अॅनिमल तर्फे तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा या शुभ दिवशी आयकॉनिक टाइम्स स्क्वेअरवर आमच्या अॅनिमल चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर आम्ही भारावून गेलो आहोत."
पाहा व्हिडीओ:
Team #Animal wishes you all a very Happy #Dussehra 🙏🏼
— Animal The Film (@AnimalTheFilm) October 24, 2023
We are overwhelmed to see our #AnimalTeaser played at the iconic Times Square on this auspicious day ✨https://t.co/MES4xDqOhv#AnimalTakesOverTimesSquare #AnimalOn1stDec #AnimalTheFilm @AnilKapoor #RanbirKapoor… pic.twitter.com/V7EiQj1sdw
याआधी न्यूयॉर्क येथील टाइम्स स्केअरवर रॉकेट्री या चित्रपटाचा ट्रेलर देखील झळकला होता. 'शिवरायांचा छावा' या मराठमोळ्या चित्रपटाचं मोशन पोस्टर देखील टाईम्स स्क्वेअरवर झळकलं होतं.
अॅनिमल चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबतच अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.अॅनिमल चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी 'अॅनिमल' या चित्रपटामधील 'हुआ मैं' हे गाणं रिलीज करण्यात आलं.या गाण्यातील रणबीर आणि रश्मिका यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
कधी रिलीज होणार चित्रपट?
'अॅनिमल' हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार होता. पण नंतर चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता अॅनिमल चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रश्मिका आणि रणबीरचे चाहते 'अॅनिमल' या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Animal : 'अॅनिमल' सिनेमातील 'हुआ मैं' गाणं आऊट; रणबीर-रश्मिकाच्या सिझलिंग केमिस्ट्रीने वेधलं लक्ष