Animal Song Arjan Vailly Out: रक्ताने माखलेला रणबीर अन् जबरदस्त अॅक्शन सीन्स; 'अॅनिमल' मधील 'अर्जन वेली' गाणं रिलीज
'अॅनिमल' (Animal) या चित्रपटामधील 'अर्जन वेली' (Arjan Vailly) हे गाणं रिलीज केलं आहे. या गाण्यामध्ये रणबीर कपूरचा रावडी लूक पाहायला मिळत आहे.
Animal Song Arjan Vailly Out: सध्या अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा त्याच्या 'अॅनिमल' (Animal) या बहुप्रतिक्षित या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच बुर्ज खलिफावर या चित्रपटाचा 60 सेकंदाचा टीझर झळकला. आता चित्रपटाच्या टीमनं या चित्रपटामधील 'अर्जन वेली' (Arjan Vailly) हे गाणं रिलीज केलं आहे. या गाण्याचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता, जो पाहिल्यानंतर चाहते या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
रणबीर कपूरचा रावडी लूक
'अॅनिमल' या चित्रपटामधील 'अर्जन वेली' या 3 मिनिटांच्या गाण्यामध्ये रणबीर कपूरचा रावडी लूक पाहायला मिळत आहे. मनन भारद्वाज आणि भूपिंदर बब्बल यांनी हे गाणं गायलं आहे. गाण्यात रणबीर कपूर हा रक्ताने माखलेला दिसत आहे. तसेच या गाण्यात रणबीरचे काही अॅक्शन सीन्स देखील दिसत आहेत.
गाणं सोशल मीडियावर झालं व्हायरल
'अर्जन वेली' हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या गाण्याचे अनेक जण कौतुक करत आहेत. या गाण्याला एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'हे गाणे पाहून अंगावर शहारे आले'
कधी रिलीज होणार 'अॅनिमल'?
कबीर सिंह फेम संदीप रेड्डी वंगा यांनी 'अॅनिमल' दिग्दर्शित केला आहे, जो 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची रणबीरचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटामधील 'हुआ मैं' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या गाण्यातील रणबीर आणि रश्मिकाच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले.
You asked, and we heard 😉#ArjanVailly Song out now 🪓https://t.co/KarMXhQlB8#Animal4thSong #Animal #AnimalOn1stDec #AnimalTheFilm #MananBhardwaj #BhupinderBabbal #HimanshuShirlekar @AnimalTheFilm @AnilKapoor #RanbirKapoor @iamRashmika @thedeol @tripti_dimri23… pic.twitter.com/VIpMOPeV8n
— Animal The Film (@AnimalTheFilm) November 18, 2023
'अॅनिमल' ची स्टार कास्ट
'अॅनिमल' चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर रश्मिका मंदान्ना रणबीरच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे. कबीर सिंह फेम संदीप रेड्डी वंगा यांनी 'अॅनिमल' दिग्दर्शित केला आहे, जो 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Animal Teaser: रणबीर आणि रश्मिकाच्या 'अॅनिमल' चा टीझर झळकला टाइम्स स्क्वेअरवर; व्हिडीओ व्हायरल